रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

तेनालीराम कहाणी : जादूगरचा अहंकार

tenaliram nyay
एकदा राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारात एक जादूगार आला. तसेच त्याने अप्रतिम जादूच्या युक्त्या करून संपूर्ण दरबाराचे बराच काळ मनोरंजन केले. मग जातांना त्याने राजाकडून अनेक मौल्यवान भेट घेऊन आपल्या कलेवर अहंकार करित सर्वांना आव्हान दिले. व म्हणाला की, कोणी माझ्यासारखी जादू करू शकत का?, कोणी मला टक्कर देऊ शकत का?
 
या आव्हानाला ऐकून सर्व दरबारी शांत बसले. तेनालीरामला या जादुगरचा अहंकार आवडला नाही. व तेनालीराम उठून उभे राहिले व म्हणाले की, जे पराक्रम मी डोळे मिटून करीन, ते तू उघडे डोळे ठेवूनही करू शकणार नाहीस. आता सांग तुला माझे आव्हान मंजूर आहे का?
 
जादूगर अहंकारामुळे आंधळा झाला होता. त्याने लागलीच आव्हान स्वीकार केले. तेनालीराम ने आचारींना बोलावले व सोबत तिखट घेऊन येण्यास सांगितले. आता तेनालीराम ने आपले डोळे बंद केले व व त्यांच्यावर एक मुठी तिखट टाकले. मग थोड्या वेळानंतर त्यांनी आपले कपडे झटकले व थंड पाण्याने आपले डोळे धुतले. आता जादूगाराला म्हणाले की, तू हे उघड्या डोळ्यांनी करून दाखव. अहंकारी जादूगाराला आपली चूक समजली व व तो हात जोडून माफी मागत राजदरबारामधून निघून गेला. 
 
राजा कृष्णदेवराय तेनालीरामच्या या हुशार बुद्धीवर खुश झालेत व त्यांनी तेनालीरामला पुरस्कार देऊन  सन्मानित केले व राज्याची लाज राखलीस म्ह्णून धन्यवाद देखील दिले. 

Edited By- Dhanashri Naik