रविवार, 15 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

तेनालीराम कहाणी : दूध न पिणारी मांजर

Tenaliram & King
एकदा महाराज कृष्णदेव राय यांनी ऐकले की, त्यांच्या नगरीमध्ये उंदरांनी उच्छाद मांडला आहे. उंदरांनापसून मुक्ती मिळावी म्हणून राजाने एक हजार मांजरी पाळण्याचे ठरवले. महाराजांनी आदेश देताच एक हजार मांजरी मागवण्यात आल्या. तसेच त्या मांजरींना नगरातील लोकांमध्ये वाटण्यात येणार होते. ज्यांना मांजर देण्यात आली त्यांना एक गाय देखील देण्यात आली. म्हणजे गायीचे दूध मांजरींना पाजण्यात येईल.
 
उंदरांमुळे सर्व नागरिक त्रस्त झाले होते. तसेच मांजरी घेण्यासाठी लोकांची रांग लागली होती. तसेच तेनालीराम देखील एका रांगेत उभा राहिला. त्याला देखील एक गाय आणि एक मांजर देण्यात आली. मांजरीला घरी नेऊन त्याने एका वाटीत गरम दूध दिले. मांजरला भूक लागली होती तिने दूध पिण्यासाठी वाटीत तोंड घातले तर गरम दुधामुळे तिचे तोंड भाजले गेले. नंतर जेव्हा पण मांजरीसमोर दूध ठेवण्यात यायचे तेव्हा मांजर दूध पाहून घाबरून पाळायची. गायीचे सर्व दूध आता तेनालीराम आणि त्याचे कुटुंब पीत होते. बिचारी मांजर काही दिवसांमध्येच अशक्त झाली. ज्यामुळे तिच्यामध्ये उंदीर पकडण्याची शक्ती राहिली नाही. तीन महिन्यानंतर राजा कृष्णदेवने मांजरीची चौकशी केली. गायीचे दूध पिऊन सर्व मांजरी धष्टपुष्ट झाल्या होत्या. पण तेनालीरामची मांजर वाळून गेली होती, अशक्त झाली होती.  महाराज तेनालीरामची मांजर पाहून क्रोधीत झाले. त्यांनी लागलीच तेनालीरामला हजर राहण्याचे आदेश दिले. महाराज तेनालीरामला चिडून म्हणाले, ”तू या मांजरीचे असे काय हाल केलेस? तू मांजरीला दूध पाजले नाही का?”
 
तेनालीराम म्हणाले की, “महाराज मी रोज मांजरीसमोर एक वाटी दूध ठेवतो, मांजर दूध पित नाही यामध्ये माझा काय दोष?” महाराजांना हे ऐकून खूप आश्चर्य वटारले. ते अविश्वास भरलेल्या स्वरात म्हणाले की, ”का खोटे बोलत आहेस? मांजर दूध पीत नाही? मी तुझ्या खोट्या शब्दांमध्ये अडकणार नाही. 
 
“पण महाराज हेच खरे आहे.ही मांजर दूध 'पीत नाही” महाराज म्हणाले, “ठीक आहे. जर तुझे म्हणणे खरे निघाले तर तुला स्वर्ण मुद्रा देण्यात येतील. नाहीतर शंभर फटक्यांची शिक्षा बसेल.तेनालीराम म्हणाले मला मंजूर आहे. महाराजांनी सेवकाला आदेश दिला की, एका वाटीत दूध भरून आणा. सेवकाने दूध भरून आणले व आता महाराजांनी तेनालीरामच्या मांजरीला हातात उचलले. व तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला म्हणाले मांजर राणी दूध पिऊन घे.
 
मांजर ने दूध पहिले व घाबरून पळून गेली. “महाराज, आता तर तुम्हाला विश्वास झाला ना कीन मांजर दुध पीत नाही आहे, असे तेनालीराम म्हणाले. चला मला आता स्वर्ण मुद्रा द्या.” तसेच महाराज म्हणाले की, “ते तर ठीक आहे, मी मांजरीला लक्षपूर्वक पाहू इच्छितो.”
 
हे सांगून महाराजांनी कोपऱ्यात लपलेल्या मांजरीला आणण्यास सांगितले. मांजरीला लक्ष्यपूर्वक पाहिल्यावर दिसले की, तिच्या तोंडात जीभ जळाली आहे. तेव्हा ते समजले की मांजरीचे तोंड जळाल्यामुळे ती दूध पिण्यास घाबरते. आता महाराज तेनालीरामवर भडकले व म्हणाले की, अरे निर्दयी तू मांजरीचे तोंड जाळलेस, असे करतांना तुला काहीच वाटले नाही का?
 
तेनालीराम ने उत्तर दिले की, “महाराज, हे पाहणे तर राजाचे कर्तव्य आहे. तुमच्या राज्यात मांजरीं अगोदर लहान मुलांना दूध मिळायला हवे.” यावर महाराज हसले आणि त्यांनी तेनालीरामला सुवर्ण मुद्रा दिल्या व म्हणाले की, तुझे म्हणणे योग्य आहे, परंतु मला आशा आहे की, तू परत मुक्या प्राण्यांसोबत दुष्टता करणार नाहीस. 

Edited By- Dhanashri Naik