बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महात्मा गांधी
Written By
Last Updated : बुधवार, 2 ऑक्टोबर 2024 (10:49 IST)

महात्मा गांधीजींच्या जीवनातील प्रसंग : कधी ही खोटं बोलू नये

एकेकाळची गोष्ट आहे, महात्मा गांधी यांचे थोरले बंधू कर्जबाजारी झाले. आपल्या भावाला कर्जातून सोडविण्यासाठी गांधीजींनी आपलं सोन्याचं कडं विकलं आणि त्यातून मिळालेले पैसे आपल्या भावाला दिले. घरात आई-बाबा मारतील या भीतीपोटी त्यांनी आपल्या आई बाबांना कडं गहाळ झाल्याचं सांगितलं. 
 
पण त्यांचे मन त्यांनाच खात होते. त्यांना फार अस्वस्थ वाटत होतं. त्यांना मनातून सारखं असं वाटत होतं की खोटं बोलायला नको होतं. गांधीजींनी आपला अपराध मान्य केला आणि घडलेलं सर्व काही आपल्या वडिलांना एका कागदावर लिहून सांगितले. गांधीजींनी विचार केला की आता बाबा माझ्या या चुकीसाठी मारतील मला शिक्षा देतील, परंतु त्यांच्या बाबांनी असे काहीही केले नाही. 
 
ते पत्र वाचतातच त्यांच्या डोळ्यातून घळ-घळ अश्रू वाहू लागले. गांधीजींना या गोष्टी पासून फार वाईट वाटले. त्यांना जाणीव झाली की प्रेम हिंसापेक्षा अधिक प्रभावशाली आहे.