Festival Posters
✕

Remove Excess Oil From Food भाजीत जास्त तेल पडल्यास हे उपाय अमलात आणा

Updated: सोमवार, 26 जून 2023 (13:44 IST)
 
जर तुमच्या जेवणात जास्त तेल असेल तर तुम्ही बर्फाच्या साहाय्याने तेल काढू शकतो पण ते कसे ते जाणून घेऊया.
 
आइस क्यूबच्या फ्रीजिंग प्वाईंटमुळे तेल गोठतं. त्याचा थर सहज काढता येतो. जेव्हा बर्फाच्या क्यूबवर तेलाचा थर तयार होऊ लागतो, तेव्हा तुम्हाला लगेच बर्फ काढून टाकावा लागेल.
 
बर्फाने तेल कसे काढायचे?
तुम्हाला अद्याप त्याबद्दल माहिती नसल्यास या लेखात जाणून घ्या की बर्फाच्या मदतीने अतिरिक्त तेल कसे काढायचे. जर तुमच्या ग्रेव्हीमध्ये, भाज्यांमध्ये किंवा डाळीमध्ये जास्त तेल असेल तर चतुर्थांश प्लेट, वाटी किंवा कोणत्याही पळीत 4-5 बर्फाचे तुकडे ठेवा. भांडी थंड झाल्यावर ग्रेव्हीवर हलक्या हाताने फिरवा. त्यामुळे जास्तीचे तेल भांड्याला चिकटून राहते. तुमची जास्त तेलाची समस्या मिटेल.
 
पळी वापरा
तुम्ही पळीच्या मदतीने अन्नातील अतिरिक्त तेल देखील काढून टाकू शकता. जर स्वयंपाक करताना तुमच्या लक्षात आले की तेल खूप आहे, भाजी तेल सोडू लागली आहे तर एका पळी किंवा इतर खोल डाव घेऊन तेल काढता येऊ शकतं. या दरम्यान भाजी ढवळू नका, कारण तेल नंतर अन्नात मिसळेल आणि ते काढणे तुम्हाला कठीण होईल. आपण शिजवल्यानंतर तेल देखील काढू शकता. आपले अन्न थोडावेळ झाकून ठेवा. वर तेल दिसू लागले की तेल काढून टाका.
 
भाजलेले बेसन वापरा
बेसनाच्या मदतीने तुम्ही जास्तीचे तेलही काढून टाकू शकता. यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा बेसन कोरडंच भाजून घ्या. आता तुम्ही जी काही भाजी तयार केली असेल, त्यात बेसन घालून मिक्स करा. बेसन हे असेच एक पदार्थ आहे, जे तेल शोषून घेते. त्यामुळे भाजीची चवही वाढेल आणि तेलही दिसणार नाही.
 
काही भाज्या अशा असतात की त्या जास्त तेल पितात, पण शिजवल्यानंतर ते जास्तीचे तेल सोडू लागतात. अशा परिस्थितीत आधी जास्त तेल टाकणे टाळावे. लक्षात ठेवा की तुम्ही आधी कमी तेल टाकून नंतर गरज पडल्यास तेल वेगळ्या गरम करुन देखील पदार्थांत मिक्स करु शकता.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

सासू-सुनेच्या नात्यात गैरसमज वाढू नयेत म्हणून रोजच्या आयुष्यात काय बदल कराल?

कमी तेलात बनवा कुरकुरीत उपवासाचे कटलेट; नवरात्रीत संध्याकाळच्या भुकेसाठी उत्तम पर्याय

दररोज कॉफी पिणे ठरू शकते फायदेशीर; जाणून घ्या आरोग्यासाठी होणारे महत्त्वाचे फायदे

LLM कॉर्पोरेट एंड कमर्शियल लॉ मध्ये करिअर बनवा, पात्रता जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांनी त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी रोज करा या सोप्या स्किनकेअर टिप्स

पुढील लेख
Show comments