गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. प्रेमगीत
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जून 2023 (15:49 IST)

Marathi Kavita : तुझं माझं सोबत असणं, अर्थ काही नाही

तुझं माझं सोबत असणं, अर्थ काही नाही,
सोबत आहोत पण तुझं मन शोधतय अजून काही,
मला दिसतं न तुझ्या नजरेत काही वेगळं,
भासवतोस तू , तू माझाच पण कारण आगळ,
इतक्या वर्षांनी साथ म्हणून थोडी आपुलकी असेल,
पण प्रेम नव्हे ते, वाटत नाही तुला, ते मज समजले ही असेल,
अर्थहीन वाटते मज अशी तुझी सोबत,इच्छाहीन,
दिसतो सहप्रवासी पण ठिकाणं दिशाहीन,
खूप मोठे कलाकार आहोत आपण, भूमिका छान वठवतो ,
गुंतलो ना एकमेकांत, पण एकत्र दिसतो.
संपेल ही कदाचित हा ही प्रवास आपला,
नियतीने लिहिलेला व आपण वठवलेला, जीवनपट आपला.
..अश्विनी थत्ते.