Festival Posters

चाणक्य नीती : पती-पत्नी यांच्यात कधीच वाद होणार नाही

Updated: मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (13:47 IST)
 
चाणक्याने मनुष्यावर परिणाम करणाऱ्या विषयांचा सखोल अभ्यास केला. चाणक्याच्या मते, ज्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात गोडपणा टिकून राहतो तो माणूस नेहमी आपल्या आयुष्यात यश मिळवत, याचा उलट वैवाहिक जीवनात वाद-मतभेद आणि तणाव असल्यास माणूस कितीही हुशार आणि सक्षम असलास, त्याचा जीवनात नेहमी निराशा असते. असे लोकं मानसिक सुख-शांती पासून वंचित राहतात.
 
चाणक्यामते, नवरा बायकोचं नातं बळकट करण्याची जबाबदारी दोघांची असते. म्हणून दोघांनाच या नात्याला दृढ करण्यासाठी गंभीर असायला हवं. यामुळे आपले नातं अधिक बळकट होऊ शकतं.
 
* प्रत्येक लहान गोष्ट आपसात सामायिक करावी - 
नवरा बायकोच्या नात्यात विचारांच्या देवाण-घेवाणमध्ये कोणत्या प्रकाराचा अडथळा येऊ नये. प्रत्येक लहान मोठ्या निर्णयात नवरा-बायकोचे एकमत होणे आवश्यक आहे. या गोष्टींमध्ये कमी येऊ लागतातच नवरा बायकोतील संबंध कमकुवत होऊ लागतात.
 
* एकमेकांचा आदर करावा - 
चाणक्याच्या मते, नवरा बायकोने एकमेकांचा आदर करावा. आदरात कमी येऊ लागल्यास हे पवित्र नातं कमकुवत होऊ लागतं. नवरा बायकोच्या नात्यात दोघांचा आदर समानच असतो, म्हणून कोणाच्याही सन्मानाला ठेच लागू नये.
 
* संकटाच्या वेळी एकमेकांना आधार द्या, एकमेकांसाठी सामर्थ्यवान बना - 
चाणक्याच्या मते, संकटाच्या वेळी सेवक, मित्र आणि बायकोची किंवा नवऱ्याची ओळख होते. म्हणून संकटे आल्यावर एकमेकांना कधीही सोडू नये. ज्यावेळी नवरा बायकोच नातं बळकट होतं, त्यावेळी सर्वात मोठे संकट देखील निघून जातं. नवरा बायकोला एकत्ररीत्या सर्व संकटांना सामोरा गेले पाहिजे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

रात्रभरात तुमच्या आतड्यांमधील सर्व घाण काढण्यासाठी या टिप्स अवलंबवा

दिवसभर सक्रिय राहायचे असेल, तर सकाळी सूर्यनमस्कार करा, त्याचे फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : दयाळूपणाचे फळ; गोष्ट शेतकरी आणि कबुतराची

पावसाळ्यात या घरगुती वस्तू लवकर खराब होतात! बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात

ऋषी पंचमी विशेष: पारंपरिक आणि पौष्टिक ऋषींची भाजी Rishi Panchami Naivedyam

पुढील लेख
Show comments