रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By वेबदुनिया|

'एसएमएस डेटिंग'चे 6 नियम

प्रेम व्यक्त करण्याची वेगवेगळी माध्यमे असू शकतात. कारण आता हजारो लाखो किलोमीटर दूर असलेले एकमेकांशी आरामात संवाद साधू शकतात. पोस्टकार्डाची जागा एसएमएस आणि पत्रांची जागा ई-मेलने घेतली आहे. म्हणूनच पती किंवा प्रियकराला प्रेमाने ओतप्रोत असलेले एसएमएस करण्याअगोदर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

1. तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे :
'एसएमएस'मध्ये संक्षिप्त भाषा चलनात आहे. पण भाषेचा वापर करण्याअगोदर त्याचा नीट अर्थ समजून घ्यावा नाहीतर अर्थाचा अनर्थ घडू शकतो.

2. वेळेचे महत्त्व
प्रियकर किंवा पतीला त्यांचा लंच टाइम असेल किंवा ते कॉम्प्युटरवर काम करत असतील त्यावेळेसच एसएमएस पाठवावा. ते मीटिंग किंवा दुसर्‍या एखाद्या महत्त्वाच्या कामात असतील तर ते तुमचा मेसेज धड वाचू शकणार नाही. त्याचा आनंदही घेऊ शकणार नाही. पण मॅसेज बॅक करण्यात घाई करू नये.

3. भारंभार लिहिणे टाळाव
मेसेज जेवढा लहान असेल तेवढा त्याचा प्रभाव अधिक. मोठमोठे आणि उपदेशात्मक मेसेज वाचणे कुणालाही आवडत नाही. म्हणून शक्यतो कमीत कमी शब्दांचा वापर करावा.

 
ND
4. फोन आणि भावन
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की फोन एक यंत्र आहे. ते आपल्या सुख, दुःख, राग किंवा कुठल्याही प्रकारच्या भावनांना अभिव्यक्त करू शकत नाही. त्याद्वारे तुम्ही फक्त शब्दांना एक ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पाठवू शकता, म्हणून यावर जास्त निर्भर राहणे योग्य नव्हे.

5. मेसेज पाठवण्यापूर्वी नंबर चेक करा.
एसएमएस करताना हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे, त्याच्यापर्यंत तो नक्कीच पोहोचला पाहिजे. यासाठी मेसेज पाठवताना नंबर एकदा तपासून घेणे जरूरी आहे. अन्यथा तुमचा मेसेज भलत्याच व्यक्तीकडे जाऊ शकतो.

6. मेसेज डिलीट करा.
लपून छपून डेटिंग करत असाल तर मेसेज वाचल्यावर किंवा पाठवल्यानंतर डिलीट करणे योग्य.