गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

मार्डन रिलेशनशिपचे 4 डर्टी ट्रूथ

ते दिवस सरले जेव्हा दोन प्रेम करणारं जोडपं एकमेकासोबत किंवा एकमेकासाठी वाट बघतं जीवन काढायचं. आता नवीन युगात फक्त एकच गोष्ट चालते आणि ती हे मॉर्डन रिलेशनशिप, ज्यात काही बंधन नाही, रोख-टोक नाही आणि कोणतीही जबाबदारीही नाही. या रिलेशनशिपमागे सर्वात मोठा हात आहे सोशल मीडियाचा. एक क्षणात येथे संबंध बनतात आणि दुसर्‍या क्षणात तुटतातही. बाहेरहून चकचकीत दिसणारे हे संबंध आतून पोकळ असतात. या रिलेशनशिपमागे काय डर्टी ट्रूथ आहे बघू:
सोशल मीडिया
अशा संबंधात असणारे अधिकश्या लोकांची भेट सोशल मीडियाच्या माध्यमाने होते. टेक्‍सटिंग, वॉट्स अॅपवर खरंच भावनिक गप्पा असता की टाईमपास हे कळून येत नाही आणि यामुळे जेवढ्या लवकर संबंध बनतात तेवढ्याच लवकर विस्कटतातही. सोशल मीडियामुळे जुळणार्‍या संबंधांमध्ये पर्सनल चॅटिंग, एकमेकाच्या स्टेट्सवर आलेले कमेंट्स व अश्या काही कारणांमुळे गैरसमज निर्माण होतात आणि गोष्ट टोकाला जाऊन पोहचते.
 
लुक्सवर अधिक जोर
पार्टनरला पटविण्यासाठी लोकं आपल्या लुक्समध्ये भरपूर बदल आणतात. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा कळूनच येत नाही. मन जिंकण्यापेक्षा येथे दिसणं अधिक महत्त्वाचं ठरतं. अधिक मार्डन लुककडे अधिक लोकं आकर्षित होतात, पण जिथे आधारच चुकीचा असेल तिथे संबंध टिकतील तरी कसे?

लव नाही लस्ट
येथे संबंध प्रेमावर बनत नाही म्हणून ते टिकतंही नाही. प्रेमापेक्षा वासनेवर टिकलेले हे संबंध अधिक काळ टिकणे अशक्यच आहे. सेक्‍सने जुळलेली वन नाइट स्टँड, सेक्‍स डेट आणि पार्टनर एक्‍सचेंज करणे मार्डन जगासाठी सामान्य आहे. केवळ सेक्स ओवतीभोवती फिरणारे संबंध कधीच टिकूच शकत नाही.
केअरलेस
येथे कोणीच कोणत्याही कृत्यासाठी जवाबदार नाही, की कोणाला कोणाचेही बंधन नाही. त्यातून एकमेकाप्रती संवेदना आणि काळजी तर मुळीच नाही. त्यामुळे अश्या संबंधात जुळणार व्यक्ती इगोने भरलेला असतो, तो संबंध टिकवून शकण्यात अक्षम ठरतो.