शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (15:12 IST)

तुम्ही तुमच्या पार्टनरच्या या गोष्टींवर कधीही नियंत्रण ठेवू शकत नाही

आपण प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकत नाही, याचा अर्थ आपण कितीही प्रयत्न केला तरीही आपण प्रत्येक व्यक्तीला आपल्या पद्धतीने नियंत्रित करू शकत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा लग्नाचा प्रश्न येतो तेव्हा गोष्टी जरा कठीण होतात. तुमच्या वैवाहिक जीवनात अशा काही गोष्टी आहेत ज्यांवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही.
 
तुमचा जोडीदार कुटुंबातील सदस्यांशी कसा बोलतो?
तुमचा जोडीदार स्वतःशी किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी कसे वागतो हे तुम्ही पूर्णपणे नियंत्रित करू शकत नाही. जर तुमच्या जोडीदाराची वागणूक योग्य नसेल तर तुम्ही फक्त काही प्रमाणात पार्टनरला समजावून सांगू शकता पण तुम्ही त्यांच्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकत नाही.
 
जोडीदाराचा मूड
तुम्ही तुमच्या जोडीदाराचा मूड काही प्रमाणात ठीक करण्याचा प्रयत्न करू शकता. तुम्ही त्यांचा आवडता पदार्थ शिजवून किंवा त्यांच्याशी बोलून त्यांचा मूड हलका करण्याचा प्रयत्न करू शकता, परंतु तुम्ही स्विच ऑन-ऑफ बटणाप्रमाणे जोडीदाराचा मूड पूर्णपणे ठीक करू शकत नाही.
 
जोडीदाराची जवळीक
तुमच्या जोडीदाराला किती वेळा तुमच्याशी जवळीक साधायची आहे किंवा सेक्स करायचा आहे, तुम्ही त्यांच्या इच्छेवर नियंत्रण ठेवू शकत नाही. प्रत्येकाची सेक्स ड्राइव्ह वेगळी असते, त्यामुळे तुम्ही त्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकत नाही.
 
फूड हॅबिट्स
तुम्ही पार्टनरला हेल्दी फूड घेण्यास पटवून देऊ शकता पण तुमच्या पार्टनरने कोणते अन्न खावे याविषयी तुम्ही नेहमी पार्टनरच्या डोक्यावर वर्चस्व गाजवू शकत नाही. ते त्यांच्या खाण्याच्या सवयींमध्ये काय समाविष्ट करतात ही त्यांची निवड आहे.