Dharma Sangrah
✕

अमृतसरी फिश फ्राय रेसिपी

Updated: सोमवार, 9 डिसेंबर 2024 (14:30 IST)
तिखट 1 ½  चमचा 
धणेपूड - 1 चमचा 
गरम मसाला - अर्धा चमचा 
आले-लसूण पेस्ट - 1 चमचा 
लिंबाचा रस - 1 चमचा 
तांदळाचे पीठ - 2 चमचे
कॉर्न फ्लोअर - 1 चमचा 
ताजी कोथिंबीर चिरलेली 
तेल 
चवीनुसार मीठ
 
कृती-
पंजाबी फिश फ्राय बनवण्यास सर्वात आधी माशांचे तुकडे करून ते चांगले धुवून घ्यावे. तसेच पुसून घ्यावे. आता माशांच्या तुकड्यांमध्ये हळद, मीठ, तिखट, धणेपूड, गरम मसाला आणि आले-लसूण पेस्ट घालून मिक्स करावे. आता माशात लिंबाचा रस आणि व्हिनेगर घालावे आणि 15 मिनिटे मॅरीनेट करण्यासाठी ठेवावे.तसेच आता एका भांड्यात तांदळाचे पीठ आणि कॉर्नफ्लोअर घ्यावे.  थोडेसे पाणी घालून आणि घट्ट पिठ तयार करावे. जेणेकरून माशांचे तुकडे चांगले मिक्स होतील. आता पॅनमध्ये तेल गरम करावे. तेल चांगले तापले की, आता मॅरीनेट केलेले माशाचे तुकडे पिठात बुडवून घेऊन गरम तेलात 4-5 मिनिटे ते दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यावे. आता शिजल्यावर मासे तेलातून बाहेर काढावे. आता त्यावर ताजी चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची चटणी आणि काही कांदे घालावे. तर चला तयार आहे आपली अमृतसरी फिश फ्राय रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

नखे आणि हिरड्यांमधील बदलांकडे दुर्लक्ष करू नका! आरोग्याशी संबंधित महत्त्वाचे संकेत ओळखा

LLM Labour Law करून बनवा कामगार कायद्यात करिअर! पात्रता, टॉप कॉलेजेस, नोकरीच्या संधी आणि पगार जाणून घ्या

मेंदीमध्ये अंडे मिसळून केसांना लावा; केस होतील मऊ, चमकदार आणि मजबूत, जाणून घ्या फायदे!

नवरात्रीच्या उपवासात पोटभर जेवायचे आहे? एकदा बनवून पाहा वरीच्या तांदळाचा झटपट पुलाव

नवरात्रीच्या उपवासात ॲसिडिटीचा त्रास होतोय? आराम मिळवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय

पुढील लेख
Show comments