शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 (12:58 IST)

हिवाळा विशेष : चिकन सूप बनवण्याची सोप्पी पद्धत

Chicken Soup
साहित्य-
200-250 ग्रॅम चिकन (बोनलेस) 
4 कप पाणी 
1 कांदा चिरलेला 
4-5 लसूण पाकळ्या 
1 इंच आले 
1 चिरलेले गाजर  
1/4 कप मटार 
कोथिंबीर चिरलेली 
मीठ चवीनुसार
1/2 चमचा मिरे पूड  
1 चमचा लिंबाचा रस 
1 चमचा बटर किंवा तेल 
1 चमचा कॉर्नफ्लोर 
 
कृती-
चिकन सूप बनवण्यासाठी सर्वात आधी चिकन धुवून स्वच्छ करा. यानंतर कुकर  चिकन, पाणी, थोडे मीठ आणि आले घालावे. कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या करून शिजवून घ्यावे. शिजल्यावर त्याचे छोटे तुकडे करावेत. यानंतर, टेम्परिंग करावे. 
आता फोडणीसाठी एका पॅनमध्ये बटर किंवा तेल गरम करावे. व लसूण आणि कांदा घालून हलका सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यावा. सोनेरी झाल्यावर त्यात गाजर आणि मटार घालून दोन मिनिटे परतून घ्या. यानंतर, शिजवलेले चिकनचे तुकडे घालावे.  आता यामध्ये मीठ आणि काळी मिरी पावडर घालावी. सूप घट्ट करायचं असेल तर दोन चमचे पाण्यात कॉर्नफ्लोअर विरघळवून त्यात घालावे.  5-7 मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. आता सूपमध्ये कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालावा. तुम्ही यामध्ये स्वीट कॉर्न, ब्रोकोली किंवा इतर भाज्याही घालू शकता. तर चला तयार आहे आपले चिकन सूप गरम गरम सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik