suvichar
✕

हा चंद्र

Updated: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (16:24 IST)
 
या चंद्राला वाटच नाही, एक नेमके ठिकाण नाही
हा ही नभाचा मानकरी पण लक्ष मनांच्या इंद्रगुहांतून भटकत राही
 
नटखट मोठा ढोंगी सोंगी, लिंबोणीच्या झाडामागे कधी लपतो मुलाप्रमाणे
पीन स्तनांच्या दरेत केव्हा चुरुन जातो फुलाप्रमणे
 
भग्न मंदीरावरी केधवा बृहस्पतिसम करतो चिंतन
कधी बावळा तळ्यात बुडतो थरथर कापत बघतो आतून
 
तट घुमटावर केव्हा चढतो, कधी विदुषक पाणवठ्यावर घसरुन पडतो
कुठे घराच्या कौलारावरुनी उतरुन खाली शेजेवरती
तिथे कुणाची कमल पापणी हळूच उघडून नयनी शिरतो
कुठे कुणाच्या मूक्त मनस्वी प्रतिभेसाठी द्वारपाल होऊनी जगाच्या रहस्यतेचे दार उघडतो
 
अशा बिलंदर अनंतफंदी या चंद्राचे त्या चन्द्राशी कुठले नाते?
त्या चन्द्रावर अंतरिक्ष-यानात बसूनी शास्त्रज्ञांना जाता येते
रसीक मनांना या चंद्राला पळ्भर केव्हा डोळ्यात वा जळात केवळ धरता येते
 
- कुसुमाग्रज

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

तुम्हाला पैसे वाया घालवायचे नसतील तर मोसंबी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

मासिक पाळीचे रक्त ठरतेय वैद्यकीय विज्ञानासाठी मोठा शोध; लॅबमध्ये हृदयाचा टिशू आणि गंभीर आजारांची ओळख!

Royal Marathi names for girl मुलींसाठी शाही मराठी नावे आणि त्यांचे अर्थ

वजन कमी करणारी GLP-1 औषधे घेत असाल तर सावध! मॅमोग्राम रिपोर्टवर होऊ शकतो हा परिणाम

रेल्वे स्थानकांच्या नावांना 'टर्मिनल', 'जंक्शन' आणि 'सेंट्रल' का जोडले जाते! तुम्हाला माहित आहे का?

पुढील लेख
Show comments