Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता मी पाहुणी आहे....

Updated: गुरूवार, 10 जून 2021 (10:45 IST)
तरी ती कमीच पडते..
वाळुसारखी माहेरपणाची 
वेळ निसटून जाते..
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
 
आता परत कधी येणार ?
हा सगळ्यांचा प्रश्न ऐकून 
वाईट वाटते, 
मन आतल्या आंत रडू लागते.. 
मग जबाबदारीची जाणीव होऊन 
पुन्हा शहण्यासारखे वागते..
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
 
माझ्या माहेरच्या खोलीचा 
कोपरा अनं कोपरा 
फक्त माझा आणि 
मी म्हणेल तसा असायचा 
पण आता पंखा आणि 
दिवा लावताना सुद्धा 
बटणाचा गोंधळ उडतो.. 
प्रत्येक क्षण आता 
मी पाहुणी आहे 
हे जाणवुन देतो..
 
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
 
शेवटच्या दिवशी घरातुन निघतांना 
आईच्या डोळ्यात मी बघूच शकत नाही 
कारण तसं केलं तर कधीच
मी जाऊ शकणार नाही..
मग तसंच पाणवलेले डोळे 
आणि गच्च भरलेली  
बसमध्ये बसावे लागते, 
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
 
४ दिवसांची माहेरपणाची सुट्टी 
संपलेली असते..
पाहुणचार घेऊन पाहुण्यासारखे 
आपापल्या घरी जावे लागते..
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
 
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..         
 
- सोशल मीडिया

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

आलू भेंडी रेसिपी! चमचमीत आणि झटपट होणारी सुकी भाजी

चंदनाच्या झाडावरच साप का आढळतात? सुगंध की दुसरं काही कारण?

Heavy Hips हेव्ही लोअर बॉडीसाठी ४ बेस्ट सूट कट्स; मिळेल स्लिम आणि स्टायलिश लूक!

World PT Day 2026 आज जागतिक फिजिओथेरपी दिन

Happy Matrudin Pithori Amavasya Images मातृदिन पिठोरी अमावस्या शुभेच्छा फोटो

पुढील लेख
Show comments