1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शनिवार, 5 जून 2021 (11:42 IST)

झाडे लावा झाडे जगवा

Plant trees
इवलंसं रोपटं मी
तू म्हणालास तर मरून जाईन,
 
ओंजळभर पाणी दे मला
आयुष्यभर तुझ्या कामी येईन,
 
दिलं जीवदान मला तर
तुला जगायला प्राणवायू देईन,
 
जगवलंस मला तर 
तुझ्या देवांसाठी फुलं देईन,
 
फुलवलंस मला तर
तुझ्या मुलांसाठी फळं देईन.
 
तळपत्या उन्हामध्ये 
तुझ्या कुटुंबाला सावली देईन,
 
तुझ्या सानुल्यांना खेळावया
माझ्या खांद्यावर झोका देईन,
 
तुझ्या आवडत्या पाखरांना
मायेचा मी खोपा देईन,
 
कधी पडला आजारी तर 
तुझ्या औषधाला कामी येईन,
 
झालो बेईमान जरी मी 
शेवटी तुझ्या सरणाला कामी येईन.
        
एक रोपटं

-सोशल मीडिया