Festival Posters

कविता "पाऊस आला रे आला"

रविवार, 24 ऑगस्ट 2025 (16:02 IST)
पाऊस आला रे आला
धारा झेला रे झेला

झाडे झाली हिरवी गाणी
रुणझुण पैंजण पानोपानी
सुगंध ओला रे ओला
पाऊस आला रे आला

काळ्या काळ्या नौकेपरी ढग
झुलू लागले क्षितिजावर बघ
डोंगर न्हाला रे न्हाला
पाऊस आला रे आला

कधी अचानक येतो म्हणतो
येताच नाही चकवा देतो
रिमझिम झाला रे झाला
पाऊस आला रे आला

पाऊस गाण्यासवे मुलांच्या
हळव्या गंधासवे फुलांच्या
गाणे झाला रे झाला
पाऊस आला रे आला

-मंगेश पाडगांवकर

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

घरच्या घरी हॉटेलसारखा कुरकुरीत म्हैसूर डोसा; लिहून घ्या रेसिपी

पावसाळ्यात ताप आला तर डेंग्यू की व्हायरल? ओळख कशी कराल?

बारावीनंतर डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग करा! लाखोंच्या पगाराच्या नोकरीची संधी

पावसाळ्यात कच्च्या दुधाने करा त्वचेची काळजी, चेहरा दिसेल उजळ आणि तजेलदार

भिजल्यानंतर लगेच आंघोळ करावी का? डॉक्टर काय सांगतात?

पुढील लेख
Show comments