Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रावण मासी हर्ष मानसी

Updated: शुक्रवार, 11 जून 2021 (16:03 IST)
 
उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा
पूर्ण नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा
 
बलाक माला उडता भासे कल्प सुमनची मालाची ते
उतरुनी येती अवनीवरती ग्राहगोलाची की एकमते
 
सुंदर परडी घेऊनी हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला त्या फुल माला रम्य फुले पत्री खुडती
 
सुवर्ण चंपक फुलाला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही  बघता भामारोष मनीचा मावळला
 
फडफड करून थकले अपुले पंख पाखरे सवरती
सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
 
खिल्लारे ही  चरती राणी गोपही गाणी गात फिरे
मंजुळ पाव गात त्याचा श्रावण महिमा एक सुरे
 
देव दर्शन निघती ललना हर्ष माइ ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत
 
– बालकवी
 
 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

स्तनपान करणाऱ्या मातांनी या गोष्टी चुकूनही खाऊ नयेत

Independence Day 2026 Wishes in Marathi स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मनःशांती आणि सकारात्मकतेसाठी करा ही ३ योगासने; ताण-तणाव कमी करण्यास होऊ शकते मदत!

पंचतंत्र : चिमणी, ससा आणि मांजर; गोष्ट दुष्ट मध्यस्थची

सापांना आकर्षित करणारी ही ५ झाडे तुमच्या घरच्या बागेत कधीही लावू नका

पुढील लेख
Show comments