गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 2 जून 2021 (10:46 IST)

मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यासाठी उदयनराजे तयार, हर्षवर्धन पाटील यांची माहिती

bjp harshvardhan patil
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यासाठी तयार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. 
 
 भाजपा नेते व मराठा आरक्षण समन्वय समितीचे सातारा जिल्हा निमंत्रक हर्षवर्धन पाटील दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मराठा समाजातील प्रमुख लोकांशी मराठा आरक्षणाबाबत चर्चा करत आहेत. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. 
 
उदयनराजे यांनी ट्विट करून हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीविषयी माहिती दिली. तर हर्षवर्धन पाटील यांनी उदयनराजे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. आपण उदयनराजे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत समाजावर अन्याय झालेला आहे. या संदर्भात आपल्याला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. मराठा आरक्षणासाठी कायदेशीर आंदोलनबाबत पुढाकार घेण्यास ते तयार आहेत, असे पाटील यांनी सांगितले.