1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 13 मे 2021 (08:06 IST)

एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षा महापोर्टलवर : - महाराष्ट्र लोकसेवा आयोग

एमपीएससीच्या रखडलेल्या गट ब,गट क, आणि गट ड च्या परीक्षा महापोर्टलवर म्हणजेच महापरिक्षा पोर्टलवर घेण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने या परीक्षा महापोर्टलवर घेण्यात येतील का ? अशी विचारणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली होती. त्यावर आता आयोगाने सकारात्मक उत्तर दिलं आहे.
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सरकारच्या विविध विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या ‘गट ब आणि गट क’ च्या पदांसाठी परीक्षांचं आयोजन करण्यास तयारी दर्शवली आहे. त्याच बरोबर आयोगाने सरकारसमोर काही मुद्दे आणि अटी देखील मांडले आहेत. यावर सरकारने लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे.
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग विनियम 1965 मध्ये आवश्यक ते बदल करणे. सर्व शासकीय विभागांच्या सर्व संवर्गांचे सेवा प्रवेश नियम आयोगाच्या सहमतीनं सुधारित करणे, लोकसेवा आयोगाकडील मनुष्यबळ वाढवणे, यासह अटींवर लोकसेवा आयोग परीक्षा घेण्यास तयार असल्याचं सरकारला कळवण्यात आलं आहे.