Festival Posters
✕

व्यक्तिविशेष : पु. ल. देशपांडे पुण्यतिथी

Updated: शनिवार, 12 जून 2021 (08:08 IST)
 
ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.
 
पुलंनी जवळपास 40 वेगवेगळी पुस्तके लिहिली. बटाट्याची चाळ, असा मी असा मी, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकांच्या तर 20 हून अधिक आवृत्या खपल्या. त्यांच्या लोकप्रियतेचे उदाहरण व साहित्याचा कस जोखण्याचे यापेक्षा कोणते वेगळे परिमाण असू शकते?
 
मराठी वाडमयाचा (गाळीव) इतिहास, खोगीरभरती, पुरचुंडी, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक ही त्यांची इतर विनोदी पुस्तकेही गाजली. त्यांच्या आवृत्त्यांचेही विक्रम झाले. त्यांची निरीक्षण शक्ती अफाट होती, हे त्यांनी लिहीलेल्या प्रवासवर्णनावरूनच कळेल. त्यांनी अमेरीका, युरोप, आशियातील अनेक देश पाहिले.
 
त्यात त्यांना प्रवासात आलेले अनुभव त्यांनी अतिशय गमतीदार पध्दतीने लिहिले आहेत. पूर्वरग, अपूर्वाई, जावे त्याच्या देशा , वंगचित्रे आदी प्रवासवर्णने आहेत. त्यांची नाटकेही अतिशय गाजली. वार्याावरची वरात, तुझं आहे तुझपाशी, अमलदार, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, फुलराणी ही काही नाटके आहेत.
 
याशिवाय त्यांनी लिहिलेली काही व्यक्तिचित्रेही अजरामर ठरली आहेत. गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र, आपुलकी यात पुलंनी आपल्या सुह्रदांबद्दल लिहिले आहे. पुलंच्या नावावर काही चांगले अनुवाद आहेत. द ओल्ड मॅन अॅण्ड द सी या हेमिंग्वेच्या गाजलेल्या पुस्तकाचे एका कोळीयाने या नावाने पुलंनी केलेला अनुवाद निव्वळ अप्रतिम.
 
याशिवाय मनोहर माळगावकरांच्या कान्होजी आंग्रे हे ऐतिहासिक व्यक्तिचित्र रेखाटलेले अनुवादीत पुस्तकही पुलंच्या नावावर आहेत. बटाट्याची चाळ व असा मी असामी चे त्यांनी एकपात्री प्रयोगही बरेच केले. बा. भ. बोरकरांच्या कविता त्यांनी व सुनीताबाई देशपांडे यांनी एकत्र वाचण्याचे कार्यक्रमही त्यांनी केले.
 
पुलंनी मराठी माणसाला एवढे काही दिले आहे की 'किती घेशील दो कराने' अशी त्यांची अवस्था झाली आहे. साहित्य अकादमी व संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणार्याी मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.
आपल्या कलागुणांच बळावर मिळविलेले लाखो रुपये समाजाच्या समृद्धीसाठी त्यांनी सत्पात्री वाटले. सर्वसामान्य माणसांचे उदंड आणि निर्लेप प्रेम ज्याला लाभले, असे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व! पुणे मुक्कामी 12 जून 2000 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
 
त्यांना मिळालेले पुरस्कार खालीलप्रमाणे
पद्मश्री सन्मान
महाराष्ट्र भूषण
साहित्य अकादमी
महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार
मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
 
पुलंची साहित्यसंपदा
विनोदी साहित्य / लेखनसंग्रह
खोगीर भरती, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक, खिल्ली, अघळपघळ, पुरचुंडी, मराठी वाङमयाचा (गाळीव) इतिहास, उरलं सुरलं
 
प्रवास वर्णने
अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा, वंगचित्रे,
 
नाटके व एकांकिका
तुका म्हणे आता, अंमलदार, भाग्यवान, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, राजा ओयदिपौस, एक झुंज वार्यापशी (अनुवाद), ती फुलराणी (रुपांतर), मोठे मासे छोटे मासे, विठ्ठल तो आला आला, आम्ही लटिके ना बोलू, वयं मोठं खोटं (बालनाट्य), नवे गोकुळ (बालनाट्य)
 
अनुवाद
एका कोळियाने, काय वाट्टेल ते होईल, कान्होजी आंग्रे, स्वगत (जयप्रकाश नारायण), पोरवय
 
पत्रलेखन संग्रह
मुक्काम शांतिनिकेतन
 
निवडक पु. ल.
पुढारी पाहिजे, एक शून्य, चित्रमय स्वगत, रेडियोवरील भाषणे व श्रुतिका (भाग एक व दोन) चार शब्द टेलिफोनचा जन्म दाद, रविंद्रनाथ: तीन व्याख्याने, कोट्याधीश पु. ल., व्यक्ति आणि वल्ली
 
व्यक्तिचित्रे
गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र, आपुलकी
 
भाषणे
रसिकहो! सज्जनहो! मित्र हो! श्रोते हो!
 
एकपात्री
असा मी असामी, बटाट्याची चाळ

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

स्तनामध्ये फक्त गाठच नाही, तर हे बदलही असू शकतात धोक्याचे संकेत; वेळीच ओळखा लक्षणे

मान आणि खांदे आखडल्याने त्रस्त आहात का? ही सोपी योगासने दररोज करा

तेनालीराम कहाणी : वृद्ध भिकारी आणि राजा कृष्णदेवरायाची उदारता

हिवाळ्यात तूप गोठते? जाणून घ्या तूप दीर्घकाळ ताजे आणि रवाळ ठेवण्याच्या सोप्या टिप्स!

मराठी भाषेतील हे सुंदर शब्द रोजच्या बोलण्यातून हरवत आहेत का? अर्थासह जाणून घ्या

पुढील लेख
Show comments