गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

World Blood Donor Day 2021 : 14 जून जागतिक रक्तदान दिन

दर वर्षी शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टाईनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'जागतिक रक्तदान दिवस 'साजरा केला जातो.जागतिक आरोग्य संघटनेतर्फे दरवर्षी 14 जूनला हा उत्सव साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचे  उद्दिष्टये  लोकांना रक्तदानासाठी  प्रोत्साहित करणे आणि त्याच्याशी संबंधित गैरसमज दूर करणे आहे.
 
हा दिवस शरीरविज्ञानात नोबेल पारितोषिक मिळविणारे प्रसिद्ध शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टीन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जगभरात साजरे केले जाते.
14 जून 1868 रोजी, महान शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टीनचा जन्म झाला, त्याने मानवी रक्तात एग्ल्युटिनिन च्या अस्तित्वाच्या आधारे रक्त कणांचे  ए, बी आणि ओ गटांमध्ये वर्गीकरण केले. या वर्गीकरणाने वैद्यकीय शास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या महत्त्वपूर्ण शोधासाठी कार्ल लँडस्टीन यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले.
 
1997 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने 100 टक्के ऐच्छिक रक्तदान सुरू केले.त्यात त्यांनी 124 प्रमुख देशांचा समावेश करून सर्वाना ऐच्छिक रक्तदान देण्याचे आवाहन केले.या उपक्रमाचा मुख्य उद्धिष्ट होता की कोणत्याही गरजू माणसाला रक्ताची गरज पडल्यास ते त्याला पैसे देऊन विकत घेऊ लागू नये.या उद्दिष्टला सध्या करण्यासाठी आता पर्यंत 49 देशांनी ऐच्छिक रक्तदान मोहीम राबविले आहेत.
 
तथापि, अद्याप भारतासह अनेक देशांमध्ये रक्तदानासाठी पैशाचे व्यवहार केले जातात. परंतु तरीही, रक्तदात्यासंदर्भात विविध संस्था आणि वैयक्तिक पातळीवर उचललेली पावले भारतातील स्वेच्छेने रक्तदानास चालना देण्यासाठी प्रभावी ठरल्या आहेत.
 
वैद्यकीय विज्ञान रक्तदानाच्या संदर्भात म्हणतो की कोणतेही निरोगी व्यक्ती ज्याचे वय 16 ते 60 वर्षांच्या दरम्यान आहे आणि ज्याचे वजन 45 किलो पेक्षा जास्त आहे आणि ज्याला एचआयव्ही ,हेपेटायटिस बी किंवा हेपेटायटिस सी सारखे आजार झाले नसावे ती रक्तदान करू शकते.निरोगी माणसांनी रक्तदान अवश्य करावे.''रक्तदान महादान ''.