शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : सोमवार, 14 जून 2021 (08:42 IST)

14 जून जागतिक रक्तदानाचे महत्त्व आणि 13 महत्त्वाच्या गोष्टी

जागतिक रक्तदान दिन दरवर्षी 14 जून रोजी साजरा केला जातो. बरेच लोक निरोगी असूनही रक्तदान करण्यास घाबरतात, कारण त्यांच्या मनात रक्तदानाशी संबंधित अनेक गैरसमज आहेत. रक्ताअभावी बरेच लोक आपला जीव गमावतात. असं कोणाबरोबर होऊ नये, म्हणूनच 14 जून रोजी रक्तदान दिन साजरा केला जातो.
 
हा दिवस साजरा करण्याचा उद्देश लोकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे आणि त्याशी संबंधित गैरसमज दूर करणे आहे. रक्तदानास महादान असेही म्हणतात. म्हणून आपण या दिवशी रक्तदान करून लोकांचे प्राण वाचविण्याचा संकल्प केला पाहिजे.
 
चला रक्तदानाशी संबंधित 13 मनोरंजक तथ्ये जाणून घ्या.
 
1 रक्त देताना देणगीदाराच्या शरीरातून केवळ 1 युनिट रक्त घेतले जाते.
 
2 सरासरी व्यक्तीच्या शरीरात 10 युनिट्स (5-6 लिटर) रक्त असते.
 
3 कधी कधी कार अपघातात घायाळ व्यक्तीला 100 युनिट रक्ताची आवश्यकता असते.
 
4 आपण एकदा रक्तदान करून 3 लोकांचे प्राण वाचवू शकता.
 
5 भारतातील फक्त 7 टक्के लोकांचा रक्तगट 'ओ निगेटिव्ह ' आहे.
 
6 ओ निगेटिव्ह ' रक्तगट च्या व्यक्तीला युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात.या व्यक्तीचे रक्त कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस दिले जाऊ शकते.
 
7 आपत्कालीन परिस्थितीत जसे की नवजात मुलाला किंवा इतरांना रक्ताची गरज असेल आणि जर त्याचा रक्तगट माहित नसेल , तर त्याला 'ओ निगेटिव्ह ' रक्त दिले जाऊ शकते.
 
 
8 रक्तदानाची प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि रक्तदात्यास सामान्यत: त्यात कोणतीही अडचण येत नाही.
 
9 कोणीही व्यक्ती ज्याचे वय 18 ते 60 वर्ष आहे तो रक्तदान करू शकतो.
 
10 रक्तदात्याचे वजन, प्लस रेट, रक्तदाब, शरीराचे तापमान हे सामान्य असल्यावरच डॉक्टर किंवा रक्तदान कार्य संघ सदस्य आपले रक्त घेतात.
 
11 जर कधी रक्तदान केल्यावर आपल्याला चक्कर येणे, घाम येणे,वजन कमी होणे किंवा इतर कोणतीही समस्या बऱ्याच काळ राहिली असेल तर आपण रक्तदान करू नये.
 
12 पुरुष 3 महिन्यांच्या अंतराने आणि महिला 4 महिन्यांच्या अंतराने नियमितपणे रक्तदान करू शकतात
 
13 प्रत्येकजण रक्तदान करू शकत नाही. आपण निरोगी असाल तरच रक्त दान करू शकता, जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा  ताप किंवा आजार नसेल तरच आपण रक्तदान करू शकता.