deepawali
✕

pula deshpande quotes in marathi पु. ल. देशपांडे यांचे विचार

Updated: बुधवार, 12 जून 2024 (12:09 IST)
 
समाजात बेअक्कल म्हणून मानली गेलेली कामे करायला कोणी येतं नाही. फुकट तर नाहीच नाही आणि ती उपयुक्त पण बेअक्कल कामे करणाऱ्यांना आपण हीन मानतो हे तर साऱ्या सामाजिक अनास्थेचे मूळ कारण आहे.
 
क्रियापदाच मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेलं कर्म किती मोठ आहे ह्याच्यावर अवलंबून असते.
 
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे… 
 
खरं तर सगळे कागद सारखेच, फक्त त्याला अहंकार चिटकला की त्याच सर्टिफिकेट होत.
 
आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे. 
 
घड्याळाच काय अन् माणसाचं काय, आतलं तोल सांभाळणारं चाक नीट राहिलं की फार पुढे ही जाण्याची भिती नाही आणि फार मागेही पडण्याची नाही.
जुन्यात आपण रंगतो. स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत किंवा दु:खाच्या.
 
माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील पण माणुस हा गेलेली केस असु नये.
 
भरलेला खिसा माणसाला “जग” दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील “माणस” दाखवतो, 
ज्याला शंभर किलो धान्याचं पोत उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही 
आणि ज्याला विकत घेता येतं, त्याला उचलता येत नाही, 
“विचित्र” आहे पण सत्य आहे.”
 
जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.
 
काही माणसे जन्मता असे काही तेज घेऊन येतात, की त्यांच्यापुढे  मी मी म्हणणारे उगीचच हतबल होतात.
 
रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो. 
 
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

करवा चौथच्या 'सरगी'मध्ये समाविष्ट असलेले मुख्य ५ घटक आणि त्यांचे महत्त्व

दिवाळीच्या गोडधोडात साखरेचा पाक बिघडला? एकतारी आणि दोनतारी पाक कसा ओळखावा?

Karwa Chauth 2026 Wishes in Marathi करवा चौथच्या शुभेच्छा

बाजारची महागडी क्रीम कशाला? या २ पदार्थांनी घरीच बनवा नॅचरल जेल; त्वचा ठेवेल वर्षानुवर्षे तरुण

हिरड्यांच्या त्रासाने किडनी खराब होऊ शकते? तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

पुढील लेख
Show comments