Festival Posters

अमृतसरचे सुवर्णमंदिर

सुधीर कुमार
प्रकाशपर्वाच्या शुभप्रसंगी वेबदुनिया परिवाराकडून आमच्या सर्व वाचकांना हार्दीक शुभेच्छा...!!

WDWD
या शुभमुहर्तावर 'धर्मयात्रा' सदरात आम्ही वाचकांना 'अमृतसरच्या सुवर्णमंदिराची सहल घडवणार आहोत. अमृतसर शहरास सुवर्णमंदिराने जागतिक प्रसिद्धी मिळवून दिली आहे. सुवर्णमंदिर म्हणजे शीख धर्मातील सर्वांत पवित्र गुरूद्वारा आहे. सोळाव्या शतकात शीखांचे चौथे गुरू रामदास यांनी एका तलावाच्या किनारी वास्तव्य केले होते. त्या तलावाच्या पाण्यात एक अद्‍भूत शक्ती होती. यावरून शहराचे अमृत+सर (अमृताचे सरोवर) हे नांव प्रचलित झाल्याचा इतिहास आहे.

गुरू रामदासांनी तलावाच्या मध्यभागी एक मंदिर बांधले. तेच आज सुवर्णमंदिर या नावाने ओळखले जाते. येथे एप्रिल महिन्यात बैसाखी उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. गुरू गोविंदसिंगांनी याच दिवशी खालसा पंथाची स्थापना केली होती. देशाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात राहणारा शीखधर्मीय आयुष्यात एकदा तरी या मंदिराचे दर्शन घेण्‍यासाठी येथे येतो.

शिखांचे चौथे गुरू रामदाससाहेब यांच्या मना त
WDWD
त्यावेळी लोकांना प्रार्थना करण्यासाठी शहराच्या मध्यभागी एक गुरूद्वारा असावा, असा विचार आला. त्यांनी पाहिलेल्या या स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्याचे काम शीखांचे पाचवे गुरू अर्जन देव साहेब यांनी केले. त्यासाठी बाबा बुड्ढाजीनेही त्यांना मदत केली. सुवर्णमंदिराचे बांधकाम इ.स. 1570 मध्ये सुरू झाले आणि सन 1577 मध्ये पूर्ण झाले. हे मंदिर धार्मिक सौहार्दाचे उदाहरण असून मंदिराची पायाभरणी मुस्लिम संत हजरत मिया मीर यांनी केली होती. मंदिराचे चारही दरवाजे एकता व सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहेत.

WDWD
सुवर्ण मंदिर शिखांचे महत्त्वाचे धार्मिक स्थळ असून त्याला हरी मंदिर असेही म्हटले जाते. मंदिराचा घुमट शुद्ध सोन्याच्या पानांनी सजविलेला आहे. हरमिंदर साहेबांचा गुरूद्वारा सरोवराच्या मधोमध आहे. सुवर्णाने आच्छादलेल्या या गुरूद्वाराचे दरवाजे चारही दिशांना उघडणारे आहेत‍.

येथे गुरूवाणीचा गजर कानी पडतो. मंदिरात येऊन प्रार्थना केल्यास अलौकिक शांततेचा अनुभव येतो.

दुखभंजनी बेरी :
सरोवरास अमृताची उपमा देण्यामागे एक आख्यायिका आहे. एक राजकन्या आपल्या वडीलांपेक्षाही परमेश्वरास महत्त्व द्यायची. परिणामी तिला वडीलांच्या संतापास सामोरे जावे लागले.

वडिलांनी कुष्ठरोग असलेल्या व्यक्तीशी तिचे लग् न
WDWD
लावले. रामदास भक्त असलेली राजकन्या राजवैभव सोडून त्यांची सेवा करण्यासाठी सरोवराजवळ आली. तेव्हा बोरीच्या झाडाखाली असलेल्या पाण्यात स्नान केल्यानंतर तिच्या पतीचा कुष्ठरोग निघून गेला. राजकन्येने ही गोष्ट रामदासांना सांगितली. ते प्रसन्न होऊन उद्गारले 'मला याच जागेचा शोध होता. येथे हरमिंदर साहेबांची स्थापना केली जाईल'. तेव्हापासून हे ठिकास अमृतसर नावांने प्रसिद्ध झाल्याचा इतिहास आहे.

शिव रक्षा स्तोत्र : भगवान शिवाची कृपा, संरक्षण आणि संकटांपासून मुक्ती देणारे प्रभावी स्तोत्र

Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे

Mahadev Aarti शंकराची आरती : लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

श्री चण्डी-ध्वज स्तोत्रम् : देवी चंडीची कृपा, संरक्षण आणि विजय मिळवून देणारे प्रभावी स्तोत्र

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

Show comments