Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खांडव्याचे भवानीमाता मंदिर

- भीका शर्मा

Updated: सोमवार, 9 जून 2008 (11:57 IST)
धर्मयात्रेच्या या भागात आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत मध्य प्रदेशातील खांडवा येथील प्रसिद्ध भवानी माता मंदिराची. या मंदिराला तुळजा भवानी मंदिर या नावानेही ओळखले जाते.

प्रभू श्री राम वनवासात असताना येथे आले होते आणि त्यांनी येथे नऊ दिवस तपस्या केली होती, अशी अख्यायिका आहे. त्यामुळे नवरात्रात येथे जत्रा भरते यात सहभागी होण्यासाठी हजारो भाविक येतात.

WD
मंदिराच्या गर्भगृहात चांदीची सुंदर कलाकुसर केलेली आहे. मातेचे मुकुट आणि छत्रसुद्धा चांदीने मढविलेले आहे. आधी भवानी मातेला वेगळ्या नावाने ओळखले जात होते. परंतु, नंतर भवानी मातेचे मंदिर म्हणूनच ती प्रसिद्धीला आली..

मंदिराचा परिसर रम्य आहे. मंदिराचे प्रवेशद्वार शंखाच्या आकृतीचे आहे. परिसरात एक मोठी दीपमाळ आहे. त्यावर शंखाच्या आकृतीत दिवे आहेत.

भवानीमातेच्या मंदिराजवळच श्रीराम मंदिर, तुळजेश्वर हनुमान मंदिर आणि तुळजेश्वर महादेव मंदिर आहेत. या मंदिरातील मूर्ती देखण्या आहेत. कुठलाही नवस न करता आपल्या इच्छा पूर्ण करणारी तुळजा भवानी माता भाविकांसाठी श्रद्धेचा विषय आहे.

कसे जायचे :
इंदूर पासून हे मंदिर किमान 140 किलोमीटरवर आहे. खांडवा हे जवळचे रेल्वेस्टेशन आहे. इंदूरचाच विमानतळ सर्वांत जवळ आहे.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा......
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Shravan special vegetables श्रावणात कांदा लसूण न वापरता या भाज्यांचा आस्वाद घ्या!

श्रावणात दररोज अशी करा महादेवांची आराधना; भाग्य उजळेल

श्रावणात उपवास करताय? जाणून घ्या महत्त्वाचे धार्मिक नियम, आहार आणि योग्य पद्धत

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

Show comments