Dharma Sangrah

बॅसिलिका ऑफ बॉम जीसस

- मॅरी रोज़ बाबा

Updated: सोमवार, 29 सप्टेंबर 2008 (10:56 IST)
धर्मयात्राच्या या भागात आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत गोव्यातील प्रसिद्ध चर्च बॅसिलिका ऑफ बॉम जीससमध्ये. राजधानी पणजी पासून 10 किलोमीटर अंतरावर गोव्याच्या जुन्या भागात हे चर्च आहे. संत फ्रांसिस झेव्हिअर्स यांची समाधी आणि त्यांचे पार्थिव शरीरांचे अवशेष ये चर्चमध्ये असल्याने हे चर्च जगभरात प्रसिद्ध आहे.

‘नेक किंवा बालक येशू’ असा ‘बॉम जीसस’ चा अर्थ होतो. 1594 साली या चर्चची स्थापना करण्यात आली. तीन मजली या चर्चमध्ये एकूण चार दरवाज्यांनी प्रवेश करता येतो. यापैकी तीन दरवाजे लहान तर एक मुख्य दरवाजा आहे. वरच्या भागात ग्रीक भाषेत प्रभू येशू यांच्या नावातील पहिले तीन अक्षर प्रतीक स्वरूपात ‘IHS’ ही तीन अक्षर लिहिण्यात आली आहेत.

WD
चर्चमध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला संत एंथनी यांची वेदी आहे. तर उजव्या बाजूला संत झेव्हिअर्स यांची मूर्ती आहे. मुख्य वेदी जवळ ‘आवर लेडी ऑफ होप’ आणि संत मायकल यांची वेदी आहे. मुख्यवेदी जवळ प्रभू येशूंची बालक रूपातील मूर्ती आहे. यामूर्तीवर संत इग्नेशियस लियोला यांची तीन मीटर उंच मूर्ती आहे. यावर एक गोलाकार आकारात फलक लावण्यात आला असून यावर ‘HIS’ अशी अक्षर कोरण्यात आली आहेत. या फलकावर त्रियेक ईश्वर पिता, पुत्र आणि प्रवित्र आत्माची चित्रे आहेत.

मुख्यवेदीच्या दरवाज्यांवर काढण्यात आलेल्या चित्रांवर सोन्याचा वलक चढवण्यात आला आहे. मुख्यवेदीच्या उजवीकडे चॅपलमध्ये पवित्र परमप्रसाद आहे आणि डाव्या बाजूला संत फ्रांन्सिस झेव्हिअर्स यांचे पार्थिव शरीर एका चांदीच्या पेटीत ठेवण्यात आले आहेत. या चॅपलच्या आत झेव्हिअर्स यांच्या जीवनावर आधारीत त्यांचा जीवनपट मांडण्यात आला आहे.

WD
2 डिसेंबर 1552 साली मुद्री यात्रे वेळी चीनमध्ये संत झेव्हियर्स यांचा मृत्यू झाला होता. परंतु त्यांच्या अंतिम इच्छेनुसार पार्थिव शरीराला 1554 मध्ये गोव्यात आणले गेले. त्यांचे शरीर गोव्यात आणले तेव्हाही तेजस्वी दिसत होते. आजही त्यांच्या मृत्यूच्या साडेचारशे वर्षांनंतरही त्यांचे शरीर अजूनही त्याच अवस्थेत असल्याचे आपल्याला दिसून येते.

दरवर्षी 3 डिसेंबरला बॉम जीजस चर्चमध्ये संत फ्रांन्सिस झेव्हिअर्स यांच्या स्मरणार्थ जत्रा भरते. या कालावधीत जगभरातून अनेक भक्त त्यांच्या पार्थिव शरीराचे दर्शन घेण्यासाठी या चर्चला भेट देतात.

चर्चला जाण्यासाठी मार्ग?
रस्ता: जुन्या गोव्यातील पणजी पासून 10 किलोमीटर अंतरावर हे चर्च आहे. पणजी पासून आपल्याला येथे जाण्यासाठी टॅक्सी, रिक्षा, आणि बस यांची सुविधा उपलब्ध आहे.

रेल्वे मार्ग: गोवा- कोंकण रेल्वेच्या माध्यमातून मडगाव किंवा वास्कोदागामा या दोन स्टेशनवर उतरून या चर्चकडे जाता येते.

हवाई मार्ग: डॅबोलियम विमानतळ हे गोव्यातील एकमेव विमानतळ असून, हे वास्को दा गामा येथे आहे. विमानाने आलेल्या प्रवाशांनी येथे उतरून टॅक्सी करून चर्चमध्ये जावे.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

Devshayani Ashadhi Ekadashi 2026 Wishes Images देवशयनी आषाढी एकादशी शुभेच्छा इमेजेस

उपवास नडणार नाही, पित्त वाढणार नाही! पाळा 'या' सोप्या ५ टिप्स

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

Budhwar Upay: बुधवारी करा हे चमत्कारी उपाय, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल

Ashadhi Ekadashi 2026 Wishes in Marathi आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश मराठीत

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

Show comments