Marathi Biodata Maker

मांत्रिकांची माता बगलामुखी

- अनिरुद्ध जोशी

Updated: सोमवार, 3 नोव्हेंबर 2008 (11:12 IST)
WD
तीनमुखी त्रिशक्ति बगलामुखी देवीचे मंदिर मध्य प्रदेशातील नलखेडे येथे लखुंदर नदीच्या काठी स्थित आहे. द्वापार युगातील हे मंदिर अत्यंत जागृत मानले जाते. त्यामुळे देशभरातील तांत्रिक-मांत्रिक, साधू-संत अनुष्ठान करण्यासाठी येथे येत असतात.

मंदिरात बगलामुखी देवीव्यतिरिक्त लक्ष्मी, श्रीकृष्ण, हनुमान, भैरवनाथ व सरस्वतीच्या मुर्ती येथे आहेत. महाभारतात विजय मिळविल्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या आदेशाने महाराज युधि‍ष्ठिर यांनी या मंदिराची स्थापना केली होती. बगलामुखी देवीची मूर्ती स्वयंभू असल्याची देखील आख्यायिका आहे.

WD
मंदिराचे पुजारी कैलाश नारायण शर्मा यांनी सांगितले की, बगलामुखी मातेचे हे फार प्राचीन मंदिर आहे. दहा पिढ्यांपासून येथे शर्मा पुजापाठ करत आहेत. 1815 साली या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला होता. भाविक मनोकामना पूर्ण करण्यासाठी येथे येत असतात.

येथील पुजारी गोपालजी पंडा, मनोहरलाल पंडा आदींनी सांगितले, की हे मंदिर स्मशानभूमीत आहे. बगलामु्‍खी देवी मुळात तांत्रिक, मांत्रिकांची देवी आहे. त्यामुळे येथे तांत्रिक अनुष्ठानाला अधिक महत्त्व आहे. संपूर्ण विश्वात मातेची तीन मंदिरे आहेत परंतु, येथील मंदिराच े महत्त्व काही वेगळ े आहे. कारण येथील मातेची मुर्ती स्वयंभू आहे व स्वत: महाराज युधिष्ठिर यांनी मंदिराची स्थापना केली आहे.

मंदिरात बेलपत्र, चमेली, आवळा, लिंब व पिंपळाचे झाड आहे. मंदिर परिसरात सुंदर बगिचा आहे. नवरात्रोत्सवात भाविकांची दर्शनासाठी रिघ लागलेली असते. परंतु, मंदिर स्मशानभूमीत असल्याने येथे वर्षभर कमीच भक्त दिसतात.

कसे पोहचाल -
हवाई मार्ग:- नलखेडे येथे जाण्यासाठी सर्वांत जवळ इंदूर येथे विमानतळ आहे.

रेल्वे मार्ग- इंदूर येथे रेल्वे स्थानक आहे. येथून देवास किंवा उज्जैन येथे जाण्यासाठी रेल्वे गाडी मिळते. देवास किंवा उज्जैन येथून शाजापुर जिल्ह्यातील नलखेडे येथे बस किंवा खाजगी वाहनाने जाता येते.

महामार्ग- इंदूर येथून साधारण 165 कि.मी. अंतरावर असलेल्या नलखेडे या गावासाठी सहज बस मिळते. तसेच देवास व उज्जैन येथून देखील बगलामुखी मातेच्या मंदिरात जाण्यात खाजगी वाहन सहज उपलब्ध होते.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

गुरुपौर्णिमेला गुरुंच्या चरणांना स्पर्श का करतात? यामागचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

Guru Purnima Wishes for Swami Samarth श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी समर्पित गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

महादेव मंदिरातील हे शिवलिंग दर १२ वर्षांनी तुटते; त्याचे तुकडे कसे जोडले जातात ते जाणून घ्या

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

Show comments