खाटूधाम येथे भीमाचा पुत्र घटत्कोच व त्याचा मुलगा बर्बरीकची पूजा श्रीकृष्ण म्हणून केली जाते. महाभारतातील युद्धात श्रीकृष्णने बर्बरीकला वरदान दिले की, तुझी कलीयुगात श्याम (श्रीकृष्ण) म्हणून पूजा केली जाईल, अशी आख्यायिका सांगितली जाते. खाटूधाम येथे श्यामजीच्या मुखवट्याची पूजा केली जाते. येथून जवळच असलेल्या रींगस येथील मंदिरात असलेल्या धडाचे पूजन केले जाते.
सालाबादाप्रमाणे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल एकादशीला येथे यात्रा भरते. त्यात अगदी देशा-परदेशातून भाविक येतात. काही पायी येतात, तर काही दंडवत घालतच खाटू नरेशाच्या दरबारात प्रवेश करतात. नवमीपासून द्वादशीपर्यंत येथे भरणार्या यात्रेत लाखों भाविक हजेरी लावतात. याशिवाय प्रत्येक महिन्याच्या एकादशीला व आठवड्याच्या रविवारी भाविकांची दर्शनासाठी रिघ लागते.
WD
खाटूधाम येथील मंदिरात दिवसभरात पाच वेळा आरती केली जाते. मंगल आरती सकाळच्या पहरी 5 वाजता, धूपारती सकाळी 7 वाजता, भोग आरती दुपारी सव्वाबाराला, संध्या आरती सायंकाळी साडेसातला, शयन आरती रात्री 10 वाजता केली जाते. कार्तिक शुक्ल एकादशीला श्यामजींच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिर 24 तास खुले ठेवण्यात येते. भाविकांकडून येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
परिसरातील प्रेक्षणीय स्थळे- श्रीकृष्ण (श्याम) भक्तासाठी खाटूधाम या पावननगरीतील 'श्याम बाग' व 'श्याम कुंड' प्रमुख प्रेक्षणीय स्थळे आहेत. 'श्याम बाग' हे तर विविधतेने नटलेले आहे. येथे श्रीकृष्णाचे परमभक्त आलूसिंग यांची समाधी आहे. श्याम कुंडात स्नान केल्याने पाप धुतले जाते व जडलेल्या अनेक व्याधी दूर होतात अशी श्रद्धा आहे.
कसे पोहचाल- महामार्ग- खाटूधाम जाण्यासाठी जयपूर व शिखर येथून राजस्थान राज्य परिवहन निगमची बस किंवा खाजगी वाहन सहज उपलब्ध होत असते.
रेल्वे मार्ग- खाटूधामपासून सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक रींगस येथे आहे. तेथून अवघ्या 15 कि. मी. अंतरावर श्यामजीचे मंदिर आहे.
हवाई मार्ग- खाटूधाम येथे जाण्यासाठी सगळ्यात जवळचे विमानतळ जयपूर येथे आहे. येथून 80 कि.मी. अंतरावर खाटू श्यामजीचे मंदिर आहे.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
Read More