' प्रशांति निलायम' हा आश्रम भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांमधील एक आहे. सत्यसाईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविक भारताच्या कानाकोपर्यातून येथे येत असतात. हळू हळू नावारूपाला आलेल्या या गावी मोठ्या हॉस्पिटलसोबत विमानतळही तयार करण्यात आले आहे. या आश्रमात श्री साईबाबांचे अनुयायी दररोज मंत्रजाप करतात. सत्य, प्रामाणिकता, शांती व सद्भाव अशा जीवन उद्दिष्ठांविषयी आलेल्या भाविकांना उपदेश देतात.
साई आश्रमातील सूर्यनारायण 'ॐ' च्या जपाने उगवतो. त्यानंतर प्रार्थना (सुप्रभातम) होते. आश्रम दिवसातून दोन वेळा भजन होतात. तसेच भाविक सत्य साईबाबांचे दर्शन देखील दोन वेळा करतात.
WD
दर्शन कार्यक्रमादरम्यान सत्य साईबाबा आपल्या भक्तांमध्ये फिरून काही भाविकांशी संवाद साधतात. त्यांना अंगारा प्रदान करतात. या व्यतिरिक्त भाविकांच्या जत्थ्याला बोलावून त्यांच्याशी वार्तालाप करतात.
दरवर्षी 23 नोव्हेंबरला श्री. साईबाबांच्या वाढदिवसानिमित्त आश्रम विद्युत रोषणाईने सजविण्यात येतो. भारतातील राजकीय पुढारी व नामांकित व्यक्ती त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात.
कसे पोहचा ल- महामार्ग- आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथून पुट्टपर्थी 80 किलोमीटरवर आहे. राज्यातील बहुतेक प्रमुख मार्गांनी ते जोडले गेले आहे. त्यामुळे पुट्टपर्थीला जाण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरातून सहज बस सेवा उपलब्ध होते.
रेल्वे मार् ग- अनंतपूर रेल्वे स्टेशनहून पुट्टापर्थी 80 किलोमीटरवर असून रेल्वे सेवा उपलब्ध आहे.
हवाई मार्ग- हैद्राबाद व बंगळूर विमानतळावरून येथे पोहचता येते. बंगळूर विमानतळ ते पुट्टपर्थी हे अंतर 120 किलोमटीर आह े.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
Read More