Festival Posters

नाती सुधारण्यासाठी खूप उपयुक्त असलेल्या 5 रिलेशन टिप्स

Updated: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (16:56 IST)
 
1 एकत्ररित्या जास्त वेळ घालवा- 
आपल्या जोडीदारासह जास्तीत जास्त वेळ घालवा. असं केल्यानं आपसातील विवाद दूर होतील आणि आपण चांगल्या प्रकारे एकमेकांना  समजू शकाल. अधिक वेळ देऊन आपण आपल्या जोडीदाराची अधिक काळजी घेऊ शकाल. या मुळे आपल्यामधील नांत अधिक घट्ट होईल. बाहेर फिरायला जावं, मुव्ही बघावं, नवीन गोष्टी करावं. एकमेकांची मदत करा. काही असं करावं की जे दोघांना आवडेल आणि असं केल्यानं आपल्याला आनंद वाटेल. असं काही करू नका जे केल्यानं आपल्यामध्ये तणाव वाढेल.  
 
2 एकमेकांना मोकळीक द्या-   
 
कधी कधी अशी परिस्थिती बनते की ज्यात आपण स्वतःला समजू  शकता. अशा वेळी एकटं राहावंसं वाटते. अशा वेळी आपल्या जोडीदाराला वेळ द्या. त्यांना त्यांच्या मनासारखं जगू द्या आणि  आपण देखील जीवन समजून घ्या.   एकमेकांच्या आयुष्यात जास्त ढवळाढवळ केल्यावर नातं ओझं वाटू लागत. जर आपले जोडीदार आपल्या मित्रांसह बाहेर जायचे असल्यास त्यांना अडवू नका. त्यांना मोकळीक द्या आणि मित्रांसह जाऊ द्या. आपला जोडीदार आपल्यावर प्रेम करतो  ह्याचा अर्थ असा नाही की त्यांच्या साठी त्यांचे मित्र महत्वाचे नाही. म्हणून नात्यात मोकळीक देणं महत्वाचे आहे.  
 
3 एक मेकांवर विश्वास ठेवा- 
कोणत्याही नात्यात जितके प्रेम आवश्यक आहे तेवढेच विश्वास असणे महत्वाचे आहे. जर आपल्या नात्यात संशय आला तर ते आपल्या चांगल्या नात्याला संपवून टाकणार. असं होऊ नये यासाठी एकमेकांवर विश्वास असणं महत्वाचे आहे. अन्यथा आपले नाते कठीण परिस्थितीत असू शकतात. जर एकमेकांवर प्रेम कमी आहे तरीही नातं टिकू शकत. परंतु जर एकमेकांवर विश्वासच नाही तर नातं तुटायला वेळ लागत नाही.  
असं म्हणतात की नाते हे नाजूक दोऱ्यासारखे आहे. अधिक ताणल्यावर     हे तुटणारच म्हणून  जर आपण आपलं नातं अधिक घट्ट करू इच्छिता तर नात्यात थोडी शिथिलता द्यावी.      
    
4 एकमेकांवर आसक्ती असावी-
आपण आपल्या जोडीदारावर किती प्रेम करता हे त्याला सांगणे देखील महत्वाचे आहे अन्यथा त्यांना हे कळणार नाही. असं म्हणतात की प्रेमाची कोणतीही भाषा नसते. ह्यांना शब्दांमध्ये सांगणे आवश्यक असते. म्हणून त्यांच्याशी आपलं नातं दृढ करा.
 
5 एक मेकांचे ऐका- 
कोणत्याही विषयावर वाद घालण्याऐवजी एकमेकांच्या गोष्टी काळजीपूर्वक ऐकून आणि समजून घ्या. वाद घालून कोणत्याही समस्येचे निराकरण होत नाही. अनावश्यकपणे आपण वाद करून प्रकरणाला खराब कराल. असं होऊ नये यासाठी एकमेकांचे पक्ष ऐकून आपली मते मांडा.
जर आपण बरोबर आहात तर आपला जोडीदार आपल्याला नक्की समजून घेईल. असं  केल्यानं परस्पर समजूतदारपणा चांगला होईल. त्यांना समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्या आणि घ्या.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नद्या प्रत्येक देशासाठी आवश्यक आहे पण या देशांमध्ये एकही नदी नाही, तरीही लोक आरामात राहतात!

मेहनत न करता लिंबाचा सगळा रस सहजपणे निघेल; फक्त लिंबू कापण्यापूर्वी ही सोपी युक्ती वापरा

गणपती बाप्पासाठी खास नैवेद्य ''गुलकंद-ड्रायफ्रूट बेसन लाडू'' नक्की ट्राय करा

ऋषी पंचमी विशेष: पारंपरिक आणि पौष्टिक ऋषींची भाजी Rishi Panchami Naivedyam

गणेशोत्सवात श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी पौष्टिक आणि अत्यंत खुसखुशीत ''मखाना पाग बर्फी''

पुढील लेख
Show comments