शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (17:50 IST)

नातं बहरण्यासाठी काही टिप्स अवलंबवा

आजच्या काळात दोघेही बरोबरीने काम करत आहे त्यामुळे दोघांना एकमेकांसाठी वेळ काढायला पाहिजे. आपल्या सुखी आयुष्यात अशा गोष्टींना जागा देऊ नका, ज्यामुळे नात्यात तणाव किंवा दुरावा येईल. काही टिप्स अवलंबवल्यावर नातं अधिक दृढ होऊन बहरेल.चला तर मग जाणून घेऊ या काय आहेत त्या टिप्स
 
1 नात्यात अहं येऊ देऊ नका. या मुळे नात्यात दुरावा वाढू शकतो.
 
2 घरातील जबाबदाऱ्या वाटून घ्या.असं केल्याने एका वरच कामात ताण जास्त येणार नाही.
 
3 सहयोगात्मक व्यवहार असावा, मग ते मुलांचे अभ्यास घेणं असो किंवा इतर काही कामे.विशेषतः जेव्हा दोघे ही कामावर जातात.असं केल्याने आपसातील सामंजस्यपणा वाढतो आणि नातं अधिक दृढ होत.
 
4 पती-पत्नी मध्ये संवाद साधताना बोलण्यावर ताबा ठेवा असं काही बोलू नका ज्या मुळे एकमेकांचे मन दुखावले जातील.
 
5 एखाद्यावेळी भांडणे झाल्यावर स्वतः नमते घ्या.जोडीदार झुकेल अशी वाट बघू नका. असं केल्याने नातं सुधारते.
 
6  एकमेकांना वेळ द्या.किती ही व्यस्त असाल तरी ही त्यांना पुरेपूर वेळ द्या.आपल्या भावना सामायिक करा.
 
7 जेवण चांगले बनले नसेल किंवा काही कामात बिघाड झाल्यावर त्यांचा वर चिडू नका, या मुळे त्यांना हिणवू नका.
 
8 आपल्या त्यांच्या कडून काय अपेक्षा आहे, त्यांना मोकळेपणाने सांगा.
 
9 बऱ्याच परिस्थितीमध्ये सहनशीलता आवश्यक आहे.म्हणून सहनशीलता सोडू नका.
 
10 जोडीदाराच्या काही चुका दुर्गुणांना दुर्लक्षित करा.
 
11 जोडीदारावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या इच्छेचा मान राखा.
 
12 आपला जोडीदार आपल्याला काही सांगू इच्छितो,तर त्याचे पूर्ण म्हणणे ऐकून घ्या मधूनच काही निर्णय देऊ नका.किंवा त्याच्या कडे दुर्लक्ष करू नका.
 
13 मीच घरचा कर्ता पुरुष आहे माझेच म्हणणे ऐकावे लागणार.असा स्वभाव ठेवू नका.
 
14 जोडीदाराच्या ध्येयाला पूर्ण करण्याची जबाबदारी घ्या.त्यांना पुढे वाढण्यासाठी प्रोत्साहन द्या.
 
15 जोडीदारावर संशय घेऊ नका,त्याच्या गोष्टी लपून ऐकू नका किंवा त्यांच्यावर हेरगिरी तर अजिबात करू नका.  

या अशा काही टिप्स अवलंबवून आपण आपले नातं अधिक घट्ट करू शकता. या ,मुळे नात्यात गोडवा येईल आणि नातं अधिक बहरेल.