शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (18:00 IST)

जावई आणि सासऱ्याचं एक सुंदर नातं

जेव्हा देखील नात्याबद्दल बोलले जाते तेव्हा आई-वडील, भाऊ-बहीण,मुलगी-सून,मुलगा-वडील ह्याच नात्याबद्दल बोलतात .परंतु सासरे -जावई हे असं नातं आहे ज्या बद्दल खूप कमी बोलले जाते. कदाचित या नात्याला आणि त्याच्या महत्वाला कोणीच समजले नसावे. हे नातं देखील सुंदर आहे जेवढे मुलगा-वडिलांचे नाते आहे. गरज आहे ह्या नात्याला समजून घेण्याची.
 
प्रत्येक नात्यात एक चांगले आणि सुखद बदल दिसून येत आहे. त्याच प्रमाणे सासरे -जावई मधील नातं देखील बहरू लागले आहे. या नात्याचे स्वरूप बदलत चालले आहे. ह्यांचे नाते मैत्रीचे होऊ लागले आहे. सासरे वडिलाप्रमाणे नव्हे तर एखाद्या मित्राप्रमाणे आपल्या जावयाशी  भेटतात आणि बोलतात. बऱ्याच वेळा असे दिसून आले आहे की ते आपापसात बरेच रहस्ये देखील सामायिक करतात.  
 
बऱ्याच प्रसंगावर हे नातं अधिक सखोल, दृढ आणि जिव्हाळ्याचे झाले आहे. आता जावई पूर्वी प्रमाणे सासऱ्यांसह शांत बसत नाही. ते मोकळ्या पणाने गोष्टी करतात. संवाद साधतात. सासरी देखील सासू -सासरे जावयाच्या भावनेला आणि गोष्टीला समजतात. 
 
* जावई म्हणजे आपल्या सासऱ्यांशी मनमोकळे पणाने गप्पा करणारा. 
* सासऱ्यांशी संकोच न करणारा. 
* आपली गोष्ट उघडपणे सांगणारा. 
* मैत्रीपूर्ण व्यवहार करणारा. 
एक काळ असा होता जेव्हा जावई आणि सासऱ्यामध्ये संकोच असायचा परंतु लोकांच्या विचारसरणीमध्ये आणि वागणुकीत बदल होत आहे. आता या नात्यात संकोच नसून पारदर्शिता आली आहे. सासरे -जावयाचे नाते आता निराळे झाले आहे. जावई आपल्या सासऱ्याचे मन ओळखतो.त्यांच्या भावना समजतो. प्रत्येक परिस्थितीत आपल्या सासऱ्यांना साथ देतो. असं नातं झाले आहे सासरे आणि जावयाचे. आज जावई एखाद्या मुलाप्रमाणे आपले सर्व कर्तव्य बजावत आहे, तर सासरे देखील आपले प्रेम त्याच्या वर ओतत आहे. तसेच या नात्याच्या प्रति लोकांच्या बघण्याच्या दृष्टिकोन देखील बदलला आहे. आता या नात्यात पूर्वी सारखा संकोच नसून आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण झाला आहे.आपसातले अंतर कमी होऊन जवळीक वाढली आहे. या मुळे हे नातं अधिकच दृढ होत आहे.