मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (20:44 IST)

रात्री झोपताना ब्रा घालून झोपू नये कारणे जाणून घ्या

बऱ्याच स्त्रियांना रात्री झोपताना ब्रा घालून झोपणे अस्वस्थ वाटते. त्या मुळे त्या ब्रा काढून झोपतात. काहींचा असा विश्वास आहे की ब्रा घालून झोपल्यानं त्यांच्या शरीराची आकृतीमध्ये बिघाड होतो.काही स्त्रिया असे मानतात ब्रा घालून झोपल्यानं आरोग्याशी निगडित तक्रारी सुरू होऊ लागतात. चला तर मग जाणून घेऊ या की अशा परिस्थितीत काय करावं. 
 
आजकाल अंडरवायर ब्रा खूपच ट्रेंड मध्ये आहे. परंतु कदाचित आपल्याला हे माहिती नाही की अशा प्रकारच्या ब्रा रक्त परिसंचरणावर वाईट परिणाम करतात. ह्याचा वायर स्तनाभोवतीच्या स्नायूंना संकुचित करतात आणि ह्याचा थेट परिणाम मज्जासंस्थेवर पडतो. 
 
ब्रा ही आपल्या शरीरावर उत्तम प्रकारे फिट बसते ज्यामुळे ह्याला जास्त काळ घातल्यावर डिस्कलरेशन, पिगमेंटेशन आणि गडद डाग येऊ शकतात.म्हणून झोपताना ब्रा काढून झोपणे चांगले आहे. तज्ज्ञांच्या मते ज्या स्त्रियांचे ब्रेस्ट किंवा स्तन जड असतात त्यांनी रात्री ब्रा घालून झोपावं ज्यामुळे त्यांचे स्तन सैल होऊ नये. जर आपण देखील ब्रा घालून झोपू इच्छिता तर हलकी आणि सैल असलेली ब्रा निवडा. जेणे करून ब्रेस्टच्या भोवती घट्ट होता कामा न ये.
 
अहवालानुसार रात्री ब्रा घालून झोपल्यानं बुरशीजन्य संसर्ग होऊ शकत. आपण जेव्हा दीर्घ काळ ब्रा घालता तर ब्रेस्ट किंवा स्तन मोकळेपणाने श्वास घेऊ शकत नाही आणि ह्याच्या भोवती बेक्टेरिया सहजपणे वाढतात. ब्रा या साठी घालतात की आपले शरीर आकारात राहील, परंतु 24 तास ब्रा घातल्यानं आपल्या शरीराचा आकार बिघडू शकतो.