Dharma Sangrah

पांढरे कपडे धुण्याची डोकेदुखी आता विसरा

शनिवार, 11 एप्रिल 2020 (15:23 IST)
पांढरे कपडे प्रत्येकाला घालाला आवडतात. कारण पांढरे कपडे घातल्यावर तुमचा लूकच बदलतो. मग ते ऑफिसला जाताना कडक इस्त्रीचा पांढरा शर्ट असो वा तुमच्या मुलाचा युनिफॉर्म किंवा तुमचा आवडता पांढरा कुर्ता. पण प्रश्न असतो ते घातल्यावर जपायचा. कारण ज्या दिवशी आपण पांढरे कपडे घालतो तेव्हा नेमका त्यावर डाग पडतो. मग आठवते तो आईचा ओरडा. पण लग्न झालं असेल तर डाग लागलेले पांढरे कपडे स्वतःच धुवायला लागतात. मोठीच समस्या असते नाही का? एवढंच नाहीतर कधी कधी पांढरे कपडे धुतल्यावर निस्तेजही वाटू लागतात. पण आता नो प्रोब्लेम. तुमच्यासाठी  काही टिप्स. ज्या वापरून तुम्ही पांढरे कपडे धुतल्यास ते राहतील पांढरे शुभ्र.
पांढरे कपडे नेही इतर कपड्यांपेक्षा वेगळे ठेवा.
पांढर कपड्यांना लगेच दुसरा रंग लागतो.
त्यामुळे ते इतर कपड्यांपासून वेगळेच ठेवावे.
सर्वात आधी कपडे धुवाला घेतलवर पांढरे कपडे धुवावे. नंतर इतर रंगाचे कपडे धुवावे.
ओव्हर-लोडिंग टाळा
कोणत्याही वॉशिंग मशीनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कपडे धुवायला टाकू नका. असं केल्याने मशीनमध्ये कपडे व्यवस्थित धुतले जात नाहीत. ज्यामुळे कपड्यातील घाण तशीच राहते. पांढरे कपडे धुताना या गोष्टींची काळजी आवर्जून घ्या.
कोमट पाण्याचा वापर
पांढर्‍या रंगाचे कपडे कधीही कोमट पाण्याने धुतल्यास जास्त स्वच्छ निघतात. अशा पाण्याने  कपडे धुतल्याने तेलाचे डाग किंवा कपड्यांची दुर्गंधी लगेच दूर होते.
व्हिनेगरचा वापर
पांढरे कपडे धुतल्यानंतर ते व्हिनेगर घातलेल्या पाण्यात भिजवून ठेवल्याही त्याची दुर्गंधी नाहीशी होते.
बेकिंग सोडा आणि लिंबू
पांढरे कपडे धुताना तुम्ही बेकिंग सोडा आणि लिंबाचा वापरही करू शकता. पांढरा शुभ्र रंग कायम राहण्यासाठी पांढरे कपडे धुण्याआधी ते लिंबाचा रस घातलेल्या पाण्यात भिजवा आणि मग धुवा. तसंच तुम्ही व्हिनेगर आणि बेकिंग सोडा घातलेल्या पाण्याने पांढरे कपडे धुतल्यासही ते पांढरेशुभ्र निघतील.
कपडे तपासा
तुम्ही जर पांढरे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकले असतील तर ड्रायरमध्ये सुकवण्याआधी ते एकदा तपासा. जर कपड्यांमध्ये कुठे डाग दिसल्यास ते पुन्हा धुवा. जर डागासकट तसेच कपडे धुतल्यास त्यवरील डाग कायम राहील.
डिटर्जंट
पांढरे कपडे धुण्यासाठी नेहमी योग्य डिटर्जंट पावडर निवडा. याशिवाय कपडे धुताना त्यात योग्य प्रमाणात डिटर्जंट घालणंही आवश्यक आहे. जास्त प्रमाणात डिटर्जंट घातल्यासही कपड्यांवर डाग पडू शकतात. तसंच कपडे निस्तेजही दिसू शकतात.

मग अशाप्रकारे तुम्ही तुमच्या पांढर्‍या कपड्यांची काळजी घेतल्यास त्यावर कधीच डाग पडणार नाहीत आणि ते स्वच्छ पांढरे शुभ्र दिसतील.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

केसांच्या वाढीसाठी रामबाण ठरू शकते ‘हे’ तेल! नियमित वापराने मिळू शकतात लांब, दाट आणि मजबूत केस

प्रोटीन पावडर पिण्यापूर्वी ही काळजी घ्या, नुकसान संभवतात

मासिक पाळी आल्यानंतर कोणता योग्य आहार घ्यावा आणि कोणता टाळावा?

अधिक मास पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा करून दाखवा हा खास नैवेद्य

५० वर्षांनंतर महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; या महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा

पुढील लेख
Show comments