Dharma Sangrah
✕

Winter Travel Tips :हिवाळ्यात प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

Updated: बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (15:01 IST)
 
1 वैद्यकीय किट सोबत ठेवा -
प्रवासात वैद्यकीय किट सोबत ठेवणे फार महत्वाचे आहे. जेणेकरुन प्रकृती अस्वास्थ्य किंवा दुखापत झाल्यास प्रथमोपचार तुमच्याकडे वेळेत उपलब्ध होईल. जर तुम्ही हिवाळ्यात फिरायला जात असाल तर तुमच्यासोबत कफ सिरप, अँटीबायोटिक्स आणि फ्लूचे औषध नक्कीच ठेवा. तसेच महिलांनी सॅनिटरी नॅपकिन किंवा टॅम्पन्स सोबत ठेवाव्यात. 
 
2 स्कार्फ आणि कानटोपी-
हिवाळ्यात थंड वारे कधीही त्रास देऊ शकतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही सहलीला जाल तेव्हा सोबत स्कार्फ आणि उबदार कानटोपी जवळ ठेवा. कान झाकल्याने, तुमचा सर्दी होण्यापासून संरक्षण देखील होईल आणि संपूर्ण प्रवासाचा आनंद घेता येईल.
 
3 सनग्लासेस-
उंच डोंगराळ भागात भटकंती आणि ट्रेकिंग सारखा प्लान घेऊन घर सोडले असेल तर. त्यामुळे सनग्लासेस सोबत ठेवा. हे विचित्र वाटू शकते. पण उंच डोंगराळ भागात अल्ट्रा व्हायोलेट किरणांचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे सनग्लासेस सोबत ठेवा.
 
4 शूज-
जर तुम्ही हिवाळ्यात बाहेर फिरायला गेलात तर चांगल्या दर्जाच्या शूजवर नक्कीच पैसे खर्च करा. जे तुमचे पाय आरामदायी, उबदार ठेवते आणि जमिनीवर चांगली पकड ठेवते. जेणेकरून तुम्ही डोंगराळ आणि बर्फाळ भागात निसरडे झाल्यास कोणत्याही अपघाताला बळी पडू नये.
 
5 बॅग -
हिवाळ्यातील सहलीला जात असाल, तर अनेक बॅग पॅक करण्याऐवजी, अशी बॅग घ्या, ज्यामध्ये अनेक खिसे बनवलेले असतील. जेणेकरुन तुम्ही तुमचे बरेचसे सामान एकाच 
बॅग मध्ये ठेवू शकता.
 
Edited By - Priya Dixit 
 
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

हिवाळ्यात तुमचे ओठ फुटतात का? त्यांना नैसर्गिकरित्या मुलायम ठेवण्यासाठी घरीच बनवा ''पारिजातक फुलांचा लिप बाम''

पौराणिक कथा : विंध्याचल पर्वताच्या गर्वाचा नाश

Saffron Milk हिवाळ्यात दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट ''केसर दूध'' पिण्याचे प्रमुख फायदे

हिवाळ्यात त्वचा कोरडी, निर्जीव आणि निस्तेज दिसू नये याकरिता ही फुले तुमच्या त्वचेला पोषण देतील

मैदा न वापरता घरीच बनवा गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत 'दाल पकवान'; एकदा खाल तर पोहे-उपीट विसराल!

पुढील लेख
Show comments