Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अदृश्य आशिर्वाद

Updated: बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (15:11 IST)
 
नवऱ्याशी बोलून तिनं यावर तोडगा काढला, रोज पाच मिनिटं लवकर उठून, सासऱ्यांनी सांगायच्याआधीच ती त्यांचा चष्मा पुसून, स्वच्छ करून ठेवू लागली. पण काही ना काही तरी कारण काढून कामावर जाणाऱ्या सुनेला सासऱ्यांनी काहीतरी छोटंसं का होईना काम सांगणं काही बंद होईना. पुढं पुढं तर असं होत गेलं की शेवटी कंटाळून कविताने सासऱ्यांच्या हाकेला ओ देणंच बंद करून टाकलं. 
 
त्यानंतर एका सुट्टीच्या दिवशी सासरेबुवा रूटीन चेक अपसाठी डॉक्टरांकडे गेले होते. कविता घरीच होती, तिनं विचार केला - अनायसे आज सुट्टी आहे, वेळ आहे आणि सासरे नाहीयेत तेवढ्यात त्यांची खोली स्वच्छ करून घेऊ, पसारा आवरू, साफसफाई करून घेऊ. 
 
पलंगाखाली सासऱ्यांची डायरी पडलेली दिसली. सासरेबुवा दिवसभर काही ना काही तरी लिहीत बसलेले असायचे, काय लिहितात ते बघू तरी म्हणून कुतूहलाने तिने डायरी चाळली. आणि एका पानाशी थबकली, लिहिलं होतं ...
 
सूनबाई, अग, हल्लीच्या या धकाधकीच्या आयुष्यात घरातून बाहेर पडताना तुम्ही मंडळी आम्हा म्हाताऱ्यांचे आशिर्वाद घ्यायला विसरता. म्हणून मग काहीतरी बहाणा काढून तुला बोलावतो झालं. तू खोलीत आलीस की मनातल्या मनात तुझ्या डोक्यावर माझा म्हाताऱ्याचा मायेचा हात ठेवतो आणि ' शुभं भवतु ' म्हणतो. तसे आमचे अदृश्य आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतातच, पण तरीही ...
 
कविताचे डोळे भरून आले. त्यांची डायरी वाचल्याचं तिनं सासऱ्यांना सांगितलं नाही, पण दुसऱ्या दिवसापासून सासरा - सून नातं जाऊन बाप लेकीचे नाते सुरू झाले होते. 
 
आता ती सगळी कामं आटोपून पाच मिनिटं आधीच सासऱ्यांच्या खोलीत जायची, त्यांचा चष्मा पुसून ठेवायची, टेबलावर च्या तांब्यात पाणी भरून ठेवायची आणि ही कामं चालू असताना सासऱ्यांशी गप्पा मारायची, वेळप्रसंगी लटके रागेही भरायची. आणि मग शाळेची वेळ झाली की मुलाला आजोबांच्या खोलीत बोलावून त्यांना टाटा करायला सांगायची. 
 
जेवणखाण तेच होतं, औषधंही तीच होती पण सासऱ्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली, चेहरा आनंदी दिसू लागला. 
 
पण शेवटी म्हातारं हाड, एके दिवशी रात्री झोपेतच हृदयविकाराचा झटका आला आणि सासऱ्यांचे दुःखद निधन झाले. अंत्यदर्शनासाठी आलेल्या प्रत्येकाने हटकून मृत्यूनंतरही त्यांच्या चेहऱ्यावर झळकणाऱ्या स्मितहास्याबद्दल लेकाचे व सुनेचे कौतुक केले होते.
 
सासऱ्यांच्या निधनाला दोन वर्षे होऊन गेली होती. पण आजही कविता रोज ऑफिसला जायच्याआधी त्यांच्या खोलीजवळ क्षणभर थबकते, वाटतं, आजही सासरे हाक मारतील आणि म्हणतील - बेटा, जरा चष्मा पुसून दे...

- सोशल मीडिया

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

मानेचे दुखणे सतावतेय? ‘ही’ सोपी योगासने करा आणि मानेच्या दुखण्यापासून मिळवा आराम

नैतिक कथा : दयाळू मुंगी; एका मदतीची सुंदर गोष्ट

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' विशेष पाणी

Krishna Baby Girl Names मुलीचं नाव ठेवताना अर्थही सुंदर हवा? श्रीकृष्णाशी संबंधित ही नावे पाहा

ग्लोइंग स्किनसाठी महागड्या क्रिम्स नको; रात्री झोपण्यापूर्वी करा हे होममेड उपाय

पुढील लेख
Show comments