suvichar

स्वर्गाची करन्सी

Updated: गुरूवार, 22 जुलै 2021 (09:03 IST)
       सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले की, आज साहेब हे काहीतरी असंबध्द काय बोलतायेत!?...  मरताना तर कुणालाच काही बरोबर नेता येत नाही... हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे आणि हे तर ढिगभर संपत्ती बरोबर न्यायची भाषा बोलतायेत... हे जमणार कसं?...
       साहेबांनी सर्वांना शोधकार्य करायला सांगितलं... बक्षिसे जाहीर केली की, जो कुणी मला यासाठी १००% प्रभावी पध्दत सांगेल, त्याला मी बेसुमार संपत्ती बहाल करीन...
        जो तो पध्दत शोधायचा प्रयत्न करू लागला, माहिती काढू लागला... पण काही जमेना... प्रत्येकजण अथक प्रयत्न करत होता... पण उत्तर काही सापडत नव्हतं... बिझनेसमन दिवसागणिक उदास होत होता... त्याला हरल्याप्रमाणेच वाटू लागलं की, मी का हे सर्व बरोबर नेऊ शकत नाही?... म्हणजे मी हे सर्व इथेच सोडून जायचं?...  का?... मला न्यायचंय हे सर्व... जे मी मेहनतीने मिळवलंय... ते मला का नेता येऊ नये?... त्याला काही  सुचेना...
       मग त्यांनी यासाठी जाहीरात दिली... भलंमोठं बक्षीस ठेवलं... पण उत्तर सापडेना...
        एक दिवस, अचानक एक माणूस या बिझनेसमनच्या ऑफिसमधे आला... 'साहेबांना भेटायचंय' म्हणाला...
       बिझनेसमननी त्याला केबिनमधे बोलावलं... तो म्हणाला, 'माझं नाव श्याम... मला तुम्हांला काही  विचारायचंय... मगच मी यावर काही उत्तर सांगू शकेन'... बिझनेसमन म्हणाला,' 'विचार'... याने विचारलं की,' साहेब, तुम्ही अमेरिकेला गेलाय?'... 'हो... 'बिझनेसमन म्हणाला... 'खरेदी केलीये तिथे!?.... श्यामने विचारले... 'हो'... बिझनेसमन म्हणाला... 'पैसे कसे दिलेत'?... श्यामने विचारले... 'कसे म्हणजे?... आपले पैसे देऊन अमेरिकन डाॅलर्स विकत घेतले व दिले... बिझनेसमन उत्तरला...
       बाकी आणखी कुठल्या कुठल्या देशात गेलात?... तिथे काय खरेदी केलीत आणि काय काय चलने वापरलीत?...
       आँस्टेलियाला आँस्ट्रेलिअन डाॅलर्स... सिंगापूरला सिंगापूर डाॅलर्स... मलेशियाला रिंगिट... जपानला येन... बांगलादेशला टका... सौदी अरेबियाला रियाल... दुबईला दिरहम्स...
थायलंडला बाथ... युरोपला युरो...
       म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी जी जी म्हणून करन्सी चालते, तीच घ्यावी लागते व वापरावी लागते... बिझनेसमन म्हणाला...
        'म्हणजे तुमच्याकडे असलेले पैसे हे सर्व ठिकाणी जसेच्या तसे चालत नाहीत"... तर ते तुम्हांला देशानुरूप, जागेनुरूप  बदलून घ्यावे लागतात... जिथे जिथे, जी जी करन्सी आहे, ती ती तुमच्याकडचे रुपये देऊन बदलून घ्यावी लागते... 'बरोबर' बिझनेसमन म्हणाला...
       मग त्याच न्यायाने तुम्हाला तुमचे पैसे देऊन त्याबदली स्वर्गाची करन्सी देखील विकत घ्यावी लागेल... तिथे तुमचे रुपये कसे चालतील?... श्याम म्हणाला...
       'मग?'... बिझनेसमनने कुतूहलाने विचारले... तिथे ही करन्सी चालणार नाही, कारण स्वर्गाची करन्सी आहे "'पुण्य"!,... आणि तिथे तीच तुम्हांला घ्यावी लागेल... मगच तुम्हाला ती वापरता येईल!...
       तेव्हा तुमच्याकडचे पैसे हे तुम्हाला 'पुण्य' नावाच्या करन्सीमध्ये रूपांतर करून घ्यावे लागतील... मगच ती बरोबर नेता येईल... आणि तिथे वापरता येईल...
       बिझनेसमनच्या डोक्यात आता जास्त लख्ख प्रकाश पडला की, शेवटी बरोबर न्यायला 'पुण्यच' कमवायला हवं!...
       इथली करन्सी अशीच रूपांतर करावी लागेल की, जी पुण्यांमधे रूपांतर होऊन मिळेल... असा काही विचार, वर्तन, आचरण करावं लागेल की, जे जाताना पुण्याच्या रूपात बरोबर नेता येईल...
       बिझनेसमनच्या प्रश्नाला यथार्थ उत्तर मिळालं होतं... तो श्यामच्या पायाच पडला... त्याला  यथोचित बक्षीस दिले आणि त्याचा सत्कार केला... मनोमन ठरवलं की, या भूतलावर जगण्यासाठी जे काही मिळवतो आहे... मिळवलं आहे... ते आता 'पुण्य' नावाच्या करन्सीमध्ये रूपांतरीत करून घ्याचचं... आणि ते शेवटपर्यंत करतच राहायचं... वरती जाताना घेऊन जायला एवढे पुरेसे आहे. 

- सोशल मीडिया

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments