ganesh chaturthi
✕

देव मंदिरात जोडीने शोभून दिसतात तर आईवडील का दिसू नये?

Updated: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (17:24 IST)
 
त्यांना टोमणे मारायची एकही संधी ती सोडत नसे. एकदा त्यांना त्या जागेतून हटवण्यासाठी तिने एक युक्ती केली.
 
"आपण मोठी कार का खरेदी करत नाही ... नवीन"
 
"कल्पना चांगली आहे, पण ठेवायची कुठे? आपल्याकडे फक्त एकच गॅरेज आहे." नवीन थोड्या चिंतेच्या स्वरात म्हणाला.
 
"जागा का नाही, ती बाग आहे ना! जिथे आजकाल दोन लव्हबर्ड्स बसतात!"
 
"तू जरा जास्तच बोलतेस!" म्हणत नविनने तिला फटकारले खरे, पण त्यानेही याबाबटुत बाबांशी बोलायचे ठरवले होते.
 
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो वडिलांकडे गेला आणि म्हणाला, "बाबा! मला आणि सोनमला मोठी कार घ्यायची आहे."
 
"पण बेटा, मोठी गाडी आधीच घरात आहे, मग तू ती ठेवणार कुठे?"
 
"या बागेतच नवं गॅरेज बांधायचा विचार करतोय मी!. सोनम काही बघणार नाही आणि आई तरी अजून किती दिवस काळजी घेईल? त्यापेक्षा ही झाडे तोडणे चांगले होईल."
 
प्रभाबाईंच्या छातीत ते ऐकून धस्स झालं! रागावर नियंत्रण ठेवत बाबा म्हणाले, "मला तुझ्या आईशी बोलावं लागेल, मला थोडा वेळ दे."
 
"काय पप्पा ... आईला काय विचारायचे .. या जागेचा काय उपयोग?", नवीन जरा चिडूनच म्हणाला. "तुम्ही दोघेही दिवसभर कुठलाही विचार न करता, चार लोकांचा विचार न करता इथे बसता. आता सोनम सुद्धा घरात आहे, लहान मुलंही आहेत. पण तुम्ही मात्र दोघेही दिवसभर झोपाळ्यावर डुलता."
 
आतून सोनमची बडबड चालूच होती.
 
नवीन आणि सोनमने त्या संध्याकाळी बाहेरून जेवण मागवले. पण ते जेवण काही केल्या या दोघांच्याही घशाखाली उतरले नाही. इच्छाच नव्हती कसली. दोघेही रात्रभर जागेचं होते!
 
पण सकाळी त्याबद्दल विचार करताना, बाबांच्या ओठांवर एक स्मित उमटले. त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन स्वतःच चहा बनवला. पण खूप निराश झालेल्या प्रभाताई त्या दिवशी झाडांना पाणी देण्यासाठी बाहेर पडल्या नाहीत, किंवा कोणाशीही बोलल्या नाहीत.
 
दिवसभर सर्वकाही सामान्य होते, पण संध्याकाळी, 'घर भाड्याने देणे आहे' असा बोर्ड घराबाहेर लटकलेला पाहून नवीनने गोंधळलेल्या आवाजात बाबांना विचारले, "पप्पा, घर मोठे आहे हे मान्य, पण हे काय"?
 
"पुढच्या महिन्यात माझ्या स्टाफमधले मिस्टर गुप्ते सेवानिवृत्त होत आहेत, ते या घरात राहतील", त्यांनी शांतपणे उत्तर दिले.
 
"पण कुठे?"
"तुमच्या भागात", अशोकजींनी साध्या आवाजात उत्तर दिले.
"आणि आम्ही?"
 
"तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकाल इतके सक्षम तर मी तुम्हाला बनवलेच आहे. दोन तीन महिन्यांत तुम्ही दुसरा फ्लॅट पाहा किंवा कंपनीच्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी जा, जिथे तुम्ही तुमच्या वयाच्या लोकांबरोबर राहू शकाल!
 
आम्ही दोघेही आमच्या वयाच्या लोकांमध्ये राहू. तुमच्या आईचं संपूर्ण आयुष्य तुम्हा सर्वांची काळजी घेण्यात गेले. आता तुमच्याकडून शहाणपणाचे धडे शिकणे एवढंच बाकी होतं."
 
"बाबा, मला असे म्हणायचे नव्हते," नवीन हात जोडत म्हणाला.
 
"नाही बेटा, तुझ्या पिढीने आम्हालाही व्यावहारिक होण्याचा धडा दिला आहे. जर आम्ही दोघे तुम्हा दोघांना एकत्र पाहून आनंदीत होऊ शकतो तर मग तुम्हाला आमच्यापासून त्रास का होतो? हे घर तुझ्या आईने बांधले आहे, हे झाड, ही फुले तुमच्यासाठी भोगलेल्या अनंत कष्टांचे साक्षीदार आहेत, म्हणून मी कोणालाही तिचा हक्काचा कोपरा हिसकावण्याचा अधिकार देणार नाही."
 
"बाबा, तुम्ही गंभीर झालात", नवीनचा आवाज आता हळवा झाला होता.
 
"नाही बेटा ... तुझ्या आईने आजवर खूप त्याग करून, खूप दुःख सहन करून मला पाठिंबा दिला. आज तिच्या कृपेने माझ्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही. म्हणूनच फक्त हा कोपराच नाही, संपूर्ण घर तिचे ऋणी आहे. तुमच्यापेक्षा तिचा या घरावर अधिक हक्क आहे.
 
आमची मुलं असल्याचा फायदा जरूर घ्या. पण जर देव मंदिरात जोडीने शोभून दिसतात तर आईवडील का दिसू नये?
- सोशल मीडिया

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments