Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माया

Updated: मंगळवार, 9 मार्च 2021 (13:27 IST)
 
कधी एकदा त्या पैलतीरावर जाऊन पोहोचतो आणि ते ऐश्वर्य उपभोगतो ह्या तीव्र इच्छेपोटी तो तरुण लगबगीने त्या नावेत जाऊन बसतो. दुसरा कोणताही विचार न करता, लगेच झपाझपा वल्ही मारायला सुरुवात देखील करतो. लक्ष फक्त उसळणाऱ्या लाटांवर आणि पैलतीरावर...काही काळ जातो. हळूहळू थकवा जाणवू लागतो. पण काहीही झालं तरी वल्ही मारणं थांबवायचं नाही, पैलतीर गाठायचाच, ह्या निश्चयाने तो वल्ही मारणं सुरूच ठेवतो. पण आता शरीर थकायला लागलं होतं. हाता-पायात गोळे येऊन अंगाचा थरकाप उडत होता. रात्र समोर ठाकली होती. दृष्टीपथात आता पैलतीर तर सोडाच, काहीच दिसत नव्हतं. सर्वत्र नुसता अंधारच अंधार ! त्याच्या मनात 'आपण काही चुकलो तर नाही ना ?

अशी शंकेची पाल चुकचुकते. आणि शेवटी न राहावल्याने, जिवाच्या आकांताने तो नावाड्याला हाका मारायला लागतो.
"अरे, काय झालं बेटा ?" असे त्या वृद्ध नावाड्याचे प्रेमळ शब्द त्या तरुणाच्या कानावर पडतात. आश्चर्याने तो मागे वळून पाहतो, तर तो नावाडी अगदी जवळ किनाऱ्यावरच रेतीवर बसला होता. त्या वृद्ध नावाड्याने हळूवार विचारलं, "अरे वेड्या, खुंट्याला बांधलेली दोरी नाही का आधी सोडायची ? तू दोरी सोडलीच नाहीस ..... आणि वल्ही मारतोयस खुळ्यासारखा ! नाव पुढं जाईल कशी ?"
 
आता ह्या गोष्टीचं मर्म लक्षात येऊ लागलंय. अथांग सागर म्हणजे ....आपलं जीवन ... अस्थिर, अडचणींच्या लाटा संकटांचे भोवरे असणारा कधी संशयाचे मत्सराचे वादळी वारे तर कधी आल्हाददायक सुखाची झुळूक.. तरी पण अथांग अंतहीन...तो उतावळा तरुण म्हणजे साधक अर्थातच आपण. वृद्ध नावाडी म्हणजे सद्गुरु.. पैलतीर म्हणजे आपल्या पारमार्थिक जीवनाचं उद्दिष्ट अर्थात, 'अंतिम लक्ष्य' ....खुंटा म्हणजे अहंकार "स्वत्व"...मी पणा ...वल्ही मारणं म्हणजे उत्तम आचरण .. ! आणि सर्वात महत्त्वाचं,  ती दोरी म्हणजे माया ....
 
ही मायेची दोरी जोपर्यंत आपण अहं च्या खुंट्यापासून सोडून, निष्ठेने आणि विश्वासाने सद्गुरुंच्या इच्छेनुसार आचरण घडवत नाही नामस्मरण करीत नाही तोपर्यंत आपल्या मनाच्या अवस्थेची नाव आपल्या उद्दिष्टाप्रत पोहोचणं कठीण आहे.

-सोशल मीडिया

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट Korean Cream Cheese Garlic Bread

घरी बनवलेले पांढरे लोणी हाडांसाठी आणि त्वचेसाठी वरदान आहे, खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

IBPS Clerk Recruitment : बँक लिपिक पदांसाठी भरती, पदवीधर उमेदवारांसाठी अर्ज खुले

नैसर्गिक ग्लो हवा आहे? तांदळाच्या पिठाचा फेस पॅक ठरू शकतो फायदेशीर

फ्रेंडशिप डे 2026: मित्रांचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? कोणत्या मित्रांपासून सावध राहावे हे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments