गरजा व ईच्छा यांचे यशस्वी नियोजन म्हणजे परमार्थाची पहिली पायरी होय !

Last Modified मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (10:58 IST)
एकाच्या आईचे परवा ९५ व्या वर्षी निधन झाले. वडील आधीच निवर्तले होते. ६५ वर्षांच्या त्यांचा सहजीवनातला संसार आणि विस्तार म्हणजे तीन लेकी, दोन लेक, आठदहा खोल्यांचा प्रशस्त बंगला, प्रत्येकाचे स्वतंत्र शयनकक्ष, कपाटे, तेवढे कपडे, कार्यप्रसंगी १०० माणसे जेवू शकतील एवढी भांडी, फर्निचर, बाग, हौसेमौजेने तीर्थयात्रा, पर्यटन करून आणलेल्या शोभेच्या वस्तू, प्रचंड माळे, आधीच्या दोन पिढ्यांचे ऐवज, वस्तू, सामान...

पण आता सर्व मुलेबाळे स्वतंत्र व स्वतःच्या कार्यक्षेत्रात मग्न, यशस्वी व अत्यंत व्यस्त जीवनक्रम असलेली आईपश्चात वर्षभर रिकामे, प्रचंड घर आवरायला कुठून सुरुवात करावी हा यक्षप्रश्नच !!

कपाटातल्या पाचशेच्या वर साड्या आता कुणीही घेऊ इच्छित नाही, १०० माणसांच्या स्वयंपाकाची घरात कुणीही उस्तवार आता करणार नाही, जुने अवाढव्य फर्निचर आता कुणाच्याच घरात मावणार नाही, शोभेच्या वस्तूंकडे निगराणी करण्यास वेळ नाही, मोठाले खरे दागिने बाळगून किंवा घालून मिरवणे सुरक्षित नाही, बागेची देखभाल करायला मनुष्यबळ नाही, अडगळी साफ करायला कष्टांची शारीरिक क्षमता नाही...
असे अनेक नकार व फुल्या मारल्यावर मग जेवढे चांगले व शक्य तेवढे गरजू संस्था व संसार असलेल्या लोकांना देण्यात आले. आठवण म्हणून आईची एक साडी घेण्यात आली असे करता करता त्या घराची सात दशकांची घडी मिटवण्यात आली !!!

या उस्तवारीत प्रचंड मनस्ताप, कठोर निर्णय, नकार, उस्तवार आणि शारीरिक व मानसिक कष्ट तसेच थकवा व ताण मुलांना सोसावा लागला.
या सगळ्यांपेक्षा सर्वाधिक मौल्यवान असा त्यांचा वैयक्तिक वेळ त्यांना वाया गेल्याची भावना निर्माण झाली.
ज्या पिढीने हे सगळे जमवण्याचा अट्टाहास करण्यासाठी कष्ट झेलले ती पिढी काळाच्या पडद्याआड गेली.
हे सर्व सांगतांना तो खरेच दुःखी, खिन्न व अंतर्मुख झाला होता. यातून काही बोध घ्यावा असे वाटले तो म्हणजे...

१)
गरजा कमी हीच आनंदाची हमी.
२)
घर हे माणसांचे वसतिस्थान आहे, वस्तूंची अडगळ नव्हे.
३)
आपल्यासाठी वस्तू, वस्तूंसाठी आपण नाही. नाहीतर अवघे आयुष्य साफसफाई करण्यात व वस्तू राखण्यात जाते.
४) प्रवासात फक्त सुंदर क्षणांचा संचय करा, शोभेच्या वस्तूंचा नव्हे.
५)
जितकी अडगळ कमी तेवढा तुमचा आत्मशोध सुलभ.
६)
विकत घ्यायच्या आधी 'का ?' चा शोध लावावा.
७)
साधेपणा, सुसंगतता आणि सुयोजकता हे नियम पाळावेत.
८)
दान हे संचय करण्यापेक्षा कधीही श्रेष्ठच मानावे.
९)
आजचा संचय उद्याची अडगळ.
१०)
दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी स्वतःच्या कष्टाचे पैसे अजिबात खर्चू नयेत.
११) जेवढ्या वस्तू कमी तितके घर मोकळा श्वास घेते, माणसे शांत व समाधानी असतात, मानसिक विकार व नैराश्य येत नाही.
१२)
सुटसुटीत, मोकळे घर म्हणजे पैशाची, मनुष्यबळ ऊर्जेची व वेळेची बचतच. हा वेळ तुम्ही परस्पर मानवी संबंध, सुसंवाद, छंद जोपासणे, व्यायाम, आरोग्य सुधारणे यासाठी देऊ शकता.
१३)
किमान गरजा ही जीवनशैली काळानुसार अत्यावश्यक गरज ठरणार आहे.
१४)
शाश्वत सुखाचा राजमार्ग हा 'समाधान' नावाच्या गावातूनच असतो.
- सोशल मीडियायावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

OIL भर्ती 2022: LPG ऑपरेटरच्या पदांसाठी येथे भरती, अर्ज कसा ...

OIL भर्ती 2022: LPG ऑपरेटरच्या पदांसाठी येथे भरती, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
OIL भर्ती 2022: Oil India Limited ने LPG ऑपरेटर आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या ...

या इको-फ्रेंडली उत्पादनांनी तुमचे घर सजवा, तुमची जीवनशैली ...

या इको-फ्रेंडली उत्पादनांनी तुमचे घर सजवा, तुमची जीवनशैली  बनवा सस्टेंनेबल
आपण वापरत असलेली प्रत्येक गोष्ट पृथ्वीसाठी महत्त्वाची आहे. तुमचा टूथब्रश किंवा कंगवा ...

Bloating Problem: उन्हाळ्यात बाहेरचे खाल्ल्याने पोट फुगीचा ...

Bloating Problem: उन्हाळ्यात बाहेरचे खाल्ल्याने पोट फुगीचा त्रास होत असल्यास हे उपाय करा
How To Cure Bloating Problem: सध्या लोकांच्या दैनंदिन जीवनशैलीत खूप बदल झाला आहे, ...

मराठी कविता : उद्या साठी ठेवता ठेवता,आज विसरून जातो

मराठी कविता :  उद्या साठी ठेवता ठेवता,आज विसरून जातो
उद्या साठी ठेवता ठेवता, आज विसरून जातो, भविष्य सुधारता सुधारता, आज जगायचं राहून जातं,

Yoga Tips :वयाच्या 60 वर्षानंतरही कोणती आसने फायदेशीर आहेत, ...

Yoga Tips :वयाच्या 60 वर्षानंतरही कोणती आसने फायदेशीर आहेत, जाणून घ्या
शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमितपणे योगासन-व्यायाम करणे अत्यंत आवश्यक मानले ...