शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (13:48 IST)

फ्यूज्ड बल्ब संकल्पना

एक वरिष्ठ कार्यकारी सेवानिवृत्त झाले आणि ते त्यांच्या शासकीय अधिकृत क्वार्टरमधून ठाण्यातील एका उच्चभ्रू वस्तीतील एका हाऊसिंग सोसायटीत शिफ्ट झाले जिथे त्यांचा स्वतःचा फ्लॅट होता. ते स्वत: ला मोठा समजत असे आणि कुणाशीही कधी बोलत नसे. दररोज संध्याकाळी सोसायटी पार्कमध्ये फिरतानाही ते इतरांकडे दुर्लक्ष करीत उलट त्यांचे कडे तिरस्काराने पहात असे.
 
एके दिवशी, असे झाले की त्याच्या शेजारी बसलेल्या एका वृद्ध व्यक्तीने त्याच्याशी संभाषण सुरू केले आणि नंतर ते एकमेकाना भेटतच राहिले.  प्रत्येक संभाषण मुख्यत: निवृत्त कार्यकारी अधिकारी आपल्या पाळीव प्राण्यांच्या विषयावर, असणाऱ्या अधिकारा बद्दल बोलत. ते सर्वाँना एकेरी नावाने सबोधित  तसेच सतत सांगत असे की “माझ्या सेवानिवृत्तीपूर्वी कार्यरत असलेल्या मोठ्या पदाची आणि उच्च पदाची, रुबाबाची कल्पना या लोकांपैकी कोणी करूही शकत नाही;  मला सेवानिवृत्ती मुळे शासकीय निवास स्थान सोडावे लागले आणि मी येथे रहाण्यास आलो" वगैरे वगैरे. तेथे येत असलेल्या इतर वयस्कर व्यक्ती त्यांचं  बोलणे शांतपणे ऐकत असत....
 
ब-याच दिवसांनी, जेव्हा त्या सेवानिवृत्त कार्यकारी इसमाने इतरांबद्दल चौकशी केली तेव्हा त्या वृद्ध श्रोत्याने तोंड उघडले आणि म्हणाले, “सेवानिवृत्ती नंतर आपण सर्व जण फ्युज उडालेल्या बल्बसारखे आहोत.  बल्बचे वँटेज काय होते किंवा ते किती प्रकाशमान होते किंवा ते किती चमकत होते हे दिवे गेल्यानंतर म्हणजे निकामी झाल्यानंतर ते फक्त दिवेच राहतात. तसेच  अधिकारी किंवा कर्मचारी म्हणा सेवानिवृत्त झाल्या नंतर किंवा सेवा निवृत्ती घेतल्यावर  ते फक्त माणुस म्हणुनच रहातात त्यांच्याकडे पहाताना काहीच फरक दिसत नाही. ते पुढे म्हणाले की, “मी गेली ५ वर्षे या सोसायटीत रहात आहे पण मी येथे येण्या पूर्वी दोन वेळा 
 
संसद सदस्य होतो हे कोणालाही सांगितले नाही. तसेच तुमच्या उजवीकडे बसलेले गृहस्थ वर्माजी हे भारतीय रेल्वेमध्ये महाव्यवस्थापक  पदावरुन  निवृत्त झालेले आहेत. तसेच पलिकडे बसलेले सिंह साहेब जे सेवानिवृत्ती पूर्वी सैन्यात मेजर जनरल होते. तसेव निव्वळ पांढ-या पोशाखात भिंतीवर बसलेली ती व्यक्ती मेहरा जी सेवानिवृत्तीपूर्वी इस्रोचे प्रमुख होते ते त्यानी कोणालाही सांगितले नाही, मलासुद्धा नाही. परंतु मला ते माहित आहे "
 
 “हे सर्व फ्यूज्ड बल्ब आता एकसारखेच आहेत - त्याचे व्होल्टेज जे काही होते - 20, 40, 60, 100 वॅट्स - त्यांच्यात आता काही फरक दिसत नाही ते एकसारखे फ्युजड बल्ब आहेत. एलईडी, सीएफएल, हलोजन, इनकॅन्डेसेंट, फ्लोरोसेंट किंवा सजावटीच्या वस्तू तयार होण्यापूर्वी ते कोणत्या प्रकारचे बल्ब होते ते महत्त्वाचे नाही ते आता फक्त एक सारखे दिसणारे बल्ब आहेत आणि तो नियम माझ्या मित्रा तुम्हाला ही लागू पडतो दिवशी तुम्ही हे समजून घ्याल त्या दिवशी या गृहनिर्माण संस्थेत तुम्हाला शांती  मिळेल. ”
 
"उगवणारा सूर्य तसेच मावळणारा सूर्य हे दोन्ही सुंदर आणि मोहक दिसतात परंतु प्रत्यक्षात, उगवत्या सूर्याला अधिक महत्त्व आणि पूजा मिळते आणि त्याची उपासनाही केली जाते, तर मावळत्या सूर्याला तितका आदर मिळत नाही परंतु त्याच मावळण ही विलोभनीय असतं तस आपल मावळण ही विलोभनीय व्हावं असं आपण वागल पाहिजे, अस काही तरी केलं पाहिजे की या जीवनाला काही अर्थ असेल आणि तेच आपण घेऊन जाणार आहोत”. आपले पदनाम, शीर्षक आणि शक्ती कायम नाही.जेव्हा आपण ते शेवटच्या एका दिवसात हरतो तेव्हा आपण पूर्वी काय होतो हि भावना ठेवल्या मुळे आपल्या जीवनात गुंतागुंत होते
 
तात्पर्य: बुध्दिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि मोहरा पुन्हा एकाच बॉक्समध्ये परत जातात .... !!
- सोशल मीडिया