suvichar
✕

केक करत आहे, मग ही काळजी घ्या.....

Written By WD
Updated: मंगळवार, 9 जानेवारी 2018 (17:20 IST)
सर्वसाधारणपणे मैदा, मीठ व बेकिंग पावडर हे घटक तीन वेळा चाळून घेण्यास सांगितलेलं असतं. त्याचं कारण असं की, तीन वेळा चाळल्यामुळे सर्व घटकांचं मिश्रण एकजीव होतं आणि थोडी हवाही त्यात मिसळते. हे कोरडं मिश्रण केकमध्ये सर्वात शेवटी घालायचं असतं आणि त्यानंतर फार घुसळायचं नसतं. फार घुसळल्यास निर्माण झालेला वायू निघून जाण्याची शक्यता असते. जास्त ग्लुटेन होण्याचीही भीती असते कारण तसं झालं तर केक कडक होऊ शकतो. म्हणून कोरडे घटक सर्वात शेवटी हलक्या हातानं मिक्स करायचे असतात.

केकसाठी लागणारे सगळे घटक खोलीच्या तपमानाला असले पाहिजेत. केक भाजत असताना कोणते रासायनिक बदल त्यात घडणार आहेत याचा विचारकरून त्याच्या कृती दिलेल्या असतात. त्यामुळे त्या तंतोतंत पाळाव्यात. केक ओव्हनमध्ये ठेवण्यापूर्वी ओव्हनचं तपमान कृतीत सांगितल्याप्रमाणे ठेवून आधी तापवून घ्यावं.

ज्या भांड्यात केक करायचा असेल त्याला लोणी किंवा तूप लावून त्यात थोडा मैदा भुरभुरावा. त्यामुळे केक भांड्याला चिकटत नाही. सगळ्यात उत्तम म्हणजे भांड्यात बटरपेपर घालावा. बटरपेपर घालताना काही वेळा तो भांड्याच्या कडेला नीट उभा रहात नाही. अशा वेळी भांड्याला पुसट तुपाचा हात सर्व बाजूंनी फिरविला तर बटरपेपर चिकटून व्यवस्थित उभा रहातो.

सेल्फ रायझिंग फ्लोअरमध्ये बेकिंग पावडर आधीच घातलेली असते. एखाद्या कृतीत असं पीठ वापरायचं असल्यास ते मुद्दाम बाजारातून मिळवण्याची किंवा बाजारात जाऊन शोधण्याची गरज नाही. १00 ग्रॅम मैद्यात १ टीस्पून बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ घातलं की तसं पीठ तयार होतं.
केकचं मिश्रण फार घट्ट झालं तर तो फुगत नाही. पातळ झालं तर सुरुवातीला फुगतो आणि मग खाली बसतो. केकच्या मिश्रणात चमचा पूर्ण बुडवून बाहेर काढून उलटा केल्यावर जर मिश्रण काही सेकंद चिकटून राहिलं आणि मग खाली पडलं तर ते योग्य आहे, असं समजावं. केक झाला की नाही हे पाहण्यासाठी सुरीचं स्वच्छ पातं केकच्या मध्याच्या जरा बाजूला केकमध्ये तळापर्यंत उभं घालावं व लगेच काढावं. जर स्वच्छ असेल तर केक झाला.

सुरीला मिश्रण चिकटलं असेल तर केक आणखी थोडा वेळ भाजावा लागेल.केकमध्ये साखर वापरताना मिक्सरमध्ये थोडी बारीक (पिठीसाखर नव्हे) करून घ्यावी म्हणजे ती लोण्यात लवकर विरघळेल. लोणी आणि साखर घुसळताना त्यात हवा मिसळून मिश्रण फुगलेलं दिसेपर्यंत, त्यातली साखर पूर्ण विरघळेपर्यंत घुसळावं.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केक बनवणं हे कौशल्याचं काम आहे. पण त्यासाठी अंडं लागतंच असं नाही. अंड्याशिवायही केक आणि बिस्किटं उत्तम होतात.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

नवरात्रीत गरबा खेळायला जाताय? आरामदायी कपडे, फुटवेअर आणि दागिने निवडण्याच्या टिप्स

वजन कमी करायचे आहे? आहारात या पदार्थांचा नक्की समावेश करा; मिळेल फिटनेसचा फायदा

या योगासनाने पोटावरील चरबी कमी होईल, योग्य पद्धत जाणून घ्या

पौराणिक कथा : माता दुर्गेची कथा

साखरपुड्यासाठी साडी निवडताय? हे पर्याय नक्की पहा! Saree Options Engagement

पुढील लेख
Show comments