Marathi Biodata Maker

Teachers Day 2022 Wishes in Marathi शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

Updated: रविवार, 4 सप्टेंबर 2022 (08:16 IST)
 
गुरूचं महत्त्व कधी होत नाही कमी…जरी तुम्ही कितीही मिळवली किर्ती…तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं…पण योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आमचं मार्गदर्शक होण्यासाठी…आम्हाला प्रेरित करण्यासाठी…आम्हाला आज जे आहोत ते बनवण्यासाठी…तुमचे खूप खूप धन्यवाद…हॅपी टीचर्स डे
 
जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देतात, देशातील या निर्मात्यांना आम्ही करतो शत शत प्रणाम. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश…
 
गुरूविना ज्ञान नाही…गुरूच्या ज्ञानाला अंत नाही…गुरूने जिथे दिलं ज्ञान तेच खरं तीर्थस्थान…मनापासून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.
 
गुरूने दिला हा ज्ञानरूपी वारसा… शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
दिलं आम्हाला ज्ञानाचं भंडार…केलं आम्हाला भविष्यासाठी तयार…आम्ही आभारी आहोत त्या गुरूंचे…ज्यांनी आम्हाला घडवलं आज. माझ्या जीवनातील प्रत्येक शिक्षकाला शतशत नमन
 
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
 
जे आपल्याला शिकवतात, आपल्याला समजवतात. आपल्या मुलांचं भविष्य घडवतात. माझे मित्र, गुरू आणि प्रकाश बनण्यासाठी धन्यवाद, शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे आशिर्वादापेक्षा कमी नाही. माझं जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद. शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आम्हाला घडवण्यासाठी जी कठोर मेहनत आणि प्रयत्न तुम्ही केले त्याबद्दल आम्ही तुमचे सदैव ऋृणी राहू. हॅपी टीचर्स डे.
 
माझ्या जीवनाची प्रेरणा आहे, तुम्हीच माझे मार्गदर्शक आहात. तुम्हीच माझ्या जीवनाचा प्रकाशस्तंभ आहात. हॅपी टीचर्स डे.
 
मी भाग्यशाली आहे की, तुमच्यासारखा गुरू मिळाला. शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
आज तुमच्यामुळे माझं भविष्य सोनेरी आहे मला प्रेरित करण्यासाठी धन्यवाद. हॅपी टीचर्स डे.
 
माझ्या आयुष्यातील प्रेरणा तुम्ही आहात. तुम्हीच मला सदैव सत्य आणि शिस्तीचा धडा दिला आहे. तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
 
जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे. तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही, फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन जगणंही शिकवता तुम्ही. शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही. खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही. जेव्हा काहीच कळत नाही तेव्हा मार्ग दाखवता तुम्ही. आयुष्यातील प्रत्येक अंधारात प्रकाश दाखवता तुम्ही. हॅपी टीचर्स डे.
 
गुरूची उर्जा सूर्यासारखी, विस्तार आकाशासारखा…गुरूंचं सान्निध्य आहे जगातील सर्वात मोठी भेट…तेच आहेत जगातील अनेक व्यक्तीमत्त्वांचे शिल्पकार. हॅपी टीचर्स डे.
 
गुरूवर्य तुमच्या उपकारांची कशी करू परतफेड..लाखो-करोडोंच्या धनापेक्षा माझे गुरू आहेत अनमोल..काय देऊ गुरूदक्षिणा, मनातल्या मनात येई विचार..आयुष्य दिलं तरी फेडता येणार नाही तुमचं ऋण.
 
तुमच्या निस्वार्थ प्रेमामुळे आम्ही घडलो. आम्हाला तुमचा विद्यार्थी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
 
पुस्तकं, खेळ, गृहपाठ आणि ज्ञान… आमच्या आयुष्यातील यशाचा स्तंभ असलेल्या शिक्षकांना हॅपी टीचर्स डे

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

राज्य सरकार कडून नाशिक सिंहस्थ कुंभासाठी १,८०० कोटी रुपयांना मंजुरी, खर्चाचे नियम अधिक कडक केले

पुणे एफडीएने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ३८ अधिकाऱ्यांच्या पथकासह एक विशेष मोहीम सुरू केली

LIVE: राज्य सरकार कडून नाशिक सिंहस्थ कुंभासाठी १,८०० कोटी रुपयांना मंजुरी

सपा आमदार रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात, भाजप आमदार परिणय फुके यांचा दावा

वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी चेन्नईतील गरुडा एरोस्पेसच्या संरक्षण ड्रोन कारखान्याला भेट देऊन स्वदेशी तंत्रज्ञानाचा आढावा घेतला

पुढील लेख
Show comments