1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (22:51 IST)

Problem in Marital Life : वैवाहिक जीवनात कुरबुरी असतील तर करा हे उपाय ...

vastu tips
वैवाहिक जीवनात कुरबुरी असतील, जोडीदाराशी पटत नसेल तर काय उपाय करावेत? त्यांच्यासाठी काही सोपे उपाय. 
 
बाजारातून दोन लाल रंगाचे कंदील आणा. त्यावर गोल्डन रंगानं डबल हॅपिनेस सिम्बॉल काढा. घराच्या नैऋत्य कोपर्‍यात हे दोन्ही कंदील टांगा.
 
एका पसरट वाडग्यात पाणी भरून घ्या. त्यात पिवळ्या किंवा लाल रंगाच्या मेणबत्त्या प्रज्वलित करून तरंगत ठेवा. हा वाडगा दर पौर्णिमेला घराबाहेर (विंडो ग्रिलमध्ये वगैरे) ठेवा.
 
पलंगाच्या पायांना चांदीची तार गुंडाळा.
 
फिरोजा हे रत्न दोघांनीही धारण करा. 
 
घराच्या नैऋत्य कोपर्‍यात दोन लाल रंगाचे बाऊल ठेवा. एका बाऊलमध्ये दोन कोळसे ठेवा, तर दुसर्‍या बाऊलमध्ये साबणाचं पाणी व तेल मिसळून ठेवा.
 
झोपताना उशाशी पाणी ठेवा. सकाळी उठल्यानंतर ते पाणी बाभळीच्या झाडाला टाका. ते ४३ दिवस करा.
 
४३ दिवस तीन केळी मंदिरात दान द्या.
 
चांदीच्या वाटीत गंगाजल आणि चांदीचा तुकडा ठेवा.
 
गुरू किंवा मातेच्या पायाला हात लावून आशीर्वाद घ्या.
 
ईशान्य कोपर्‍यात ट्रंक असेल किंवा अडगळ असेल तर हटवा.