suvichar
✕

शांत झोप लागण्यासाठी हे उपाय करुन बघा

Updated: गुरूवार, 1 जून 2023 (11:41 IST)
* पूर्व दिशेला डोके ठेवून झोपल्याने ज्ञान वाढते. दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपल्याने शांती, आरोग्य आणि समृद्धी मिळते.
* खरकटं तोंड घेऊन झोपू नये.
* पाय न धुता झोपू नये.
* एखाद्याने दुसऱ्याच्या पलंगावर, तुटलेल्या पलंगावर आणि घाणेरड्या घरात झोपू नये.
* असे म्हणतात की योगी सरळ झोपतो, डावीकडे निरोगी झोपतो, उजवीकडे आजारी झोपतो.
* शरीरशास्त्र सांगते की सरळ झोपल्याने पाठीचा कणा खराब होतो तर पालथं झोपल्याने डोळ्यांना नुकसान होते.
* रात्रीचे जेवण झोपण्याच्या 2 तास आधी घेतले पाहिजे. रात्रीचे जेवण हलके व सात्विक असावे.
* चांगल्या झोपेसाठी जेवल्यानंतर वज्रासन करा, नंतर भ्रामरी प्राणायाम करा आणि शेवटी शवासन करताना झोपी जा.
* झोपण्यापूर्वी एकदा आपल्या देवाचे ध्यान करा आणि प्रार्थना केल्यानंतर झोपी जा.
* जर खोलीचा रंग क्रीम, गुलाबी किंवा हलका हिरवा असेल तर ते झोपण्यासाठी चांगले आहे.
* तुमची खोली किंचित सुगंधित ठेवा.
* पलंगाखाली कोणतेही सामान कधीही ठेवू नका. विशेषतः लोखंडी वस्तू ठेवू नका.
* तसेच तुमच्या बेडरूममध्ये घाणेरडे कपडे ठेवणे टाळा.
* चांगली झोप येण्यासाठी चंद्राची साखळी किंवा मूनस्टोन घाला.
* तसेच लाल तिलक लावणे बंद करावे. यामुळे झोप तुटणे किंवा कमी होऊ शकते.
* रात्री बेडच्या पायाजवळ फुलदाणीत पाणी ठेवून झोपावे आणि ते पाणी सकाळी झाडांना टाकावे. यामुळे तुम्हाला झोपेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.
* सूर्यप्रकाश किंवा चंद्रप्रकाश असेल अशा खोलीत झोपणे फायदेशीर आहे.
* ज्योतिषीय सल्ला घ्या आणि मग त्यानुसार मोती किंवा ओपल घाला. यामुळे झोपही चांगली लागते.
 
झोपण्याचा मंत्र
झोपण्यापूर्वी या मंत्राचा 3 किंवा 5 वेळा जप करा आणि झोपी जा, वाईट स्वप्ने येणे बंद होईल.
या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
 
झोपेसाठी आयुर्वेदिक कृती
अश्वगंधा आणि सर्पगंधा समप्रमाणात बारीक करून त्याचे चूर्ण बनवा. रात्री झोपण्यापूर्वी चार ते पाच ग्रॅम चूर्ण एक ग्लास पाण्यासोबत घ्या. या आयुर्वेदिक औषधाने तुम्हाला शांत आणि गाढ झोप मिळेल.

सर्व पहा

गोवर्धन पूजा आणि दिवाळी यांचा काय संबंध आहे? काही महत्त्वाच्या गोष्टी

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

Bhaubeej 2026 Wishes In Marathi भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments