Dharma Sangrah
✕

किचनच्या ओट्यावर पोळ्या लाटणे योग्य आहे का?

Updated: मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025 (08:00 IST)
 
तुमच्यापैकी बरेच जण पोळी लाटण्यासाठी पोळपाट वापरत असतील, तर काही लोकांना पोळी थेट किचनच्या स्लॅबवर अर्थातच ओट्यावर लाटण्याची सवय असते.
 
पोळपाटशिवाय पोळी थेट स्लॅबवर लाटणे कितपत योग्य आहे याबद्दल वास्तुशास्त्रात वर्णन आहे. चला तर मग जाणून घेऊया किचनच्या ओट्यावर पोळी लाटणे योग्य आहे का आणि त्यामागील तर्क काय आहे.
 
किचन स्लॅबवर पोळी लाटल्यास काय होते?
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात वापरले जाणारे पोळपाट सुख-समृद्धीचा कारक मानले जाते. पोळपाट-लाटणे राहु-केतूशी संबंधित मानले जाते. 
 
यामुळेच पोळपाट - लाटणे खरेदीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी वास्तुशास्त्रात सांगण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, पोळी बनवताना पोळपाट - लाटणेचा वापर खूप महत्वाचा मानला जात असे. असे मानले जाते की पोळी बनवताना या दोन्हींचा वापर केल्यास घरात समृद्धी येते.
 
त्याच बरोबर वास्तुशास्त्रात असेही म्हटले आहे की जर पोळी थेट ओट्यावर लाटल्यास घराच्या सुख-समृद्धीमध्ये अडथळा निर्माण होतो. वास्तू दोष दिसून येतो आणि पैशाची कमतरता देखील दिसून येते. आई अन्नपूर्णाही रागावते आणि तेथून निघून जाते.
 
वास्तूच्या दृष्टिकोनातून असे मानले जाते की पोळपाट-लाटणे न वापरता थेट स्लॅबवर पोळ्या बनवण्याने घरात दारिद्र्य येते आणि अशुभ ग्रह राहू-केतूचा दुष्परिणाम घराच्या सदस्यांच्या द्धीवर आणि यशावर दिसून येतो.

सर्व पहा

श्री गजानन महाराज बावन्नी

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

गुरुवारी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप करा, जीवनातील अडथळे दूर होतील

श्रीकृष्णांनी शिशुपालाच्या १०० चुका का माफ केल्या? जाणून घ्या या पौराणिक कथेचं रहस्य!

Devuthani Ekadashi 2026: देवउठनी एकादशी नेमकी कधी, २० की २१ नोव्हेंबर? जाणून घ्या अचूक तिथी आणि शुभ मुहूर्त

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments