शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 25 ऑक्टोबर 2018 (00:26 IST)

वास्तुशास्त्रात दक्षिणमुखी व्यवसाय आणि कारखाने

दक्षिणमुखी व्यवसायासाठी समाजामध्ये अनेक प्रकारच चुकीच्या धारणा निर्माण क्षालेल्या आहेत. ज्या वास्तुशास्त्राच्या विपरीत आहे आणि मनाला त्रासदायक आहे. कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टींच्या आहारी न जाता गरजेचे असल्यास दक्षिणमुखी व्यवसायाचे निर्माण अवश्य करावे. हि दिशा व्यवसाय करणायांसाठी अतीशय शुभ असते. दक्षिणमुखी व्यवसाय करतेवेळी खालील दिलेल्या वास्तुनियमांचे पालन आवश्यक आहे.
 
मंदिराची स्थापना : दक्षिणमुखी व्यवसायाची सुरवात करतेवेळी मंदिराची स्थापना सर्वप्रथम करावी आणि मंदिरात मोठा घंटा लावावा. कारण मोठ्या घंट्यामधुन निघणारा आवाज (नाद) कंपन निर्माण करतो. त्यामुळे दक्षिण दिशेकडून येणारी नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत मिळते.
 
पाण्याची व्यवस्था : दक्षिणमुखी व्यवसायामध्ये पाण्याचा संचय उत्तर दिशेला करावा. दक्षिण दिशेला केलेला पाण्याचा संचय आकस्मीत परिणामांना निमंत्रण देतो. 
 
व्यवसायाचे छत : दक्षिणमुखी व्यवसायात छताचा उतार उत्तर दिशेकडे असावा, कारण दक्षिण दिशेला केलेले निर्माण कार्य उंच होईल आणि उत्तर दिशेचे खाली राहील, त्यामुळे व्यापारात भरपूर फायदा होईल.
 
मोकळी (भरपूर) जागा : दक्षिणमुखी व्यवसायामध्ये दक्षिण दिशेला जास्त मोकळी जागा ठेवू नये. परंतु जर अशी स्थिती तुमच्या व्यवसायात असेल तर, त्या मोकळ्‌या जागेवर दाट आणि उंच क्षाडे लावावी. वास्तु एक्सपर्टच्या मतानुसार तांब्याची प्लेट्स लावाव्यात, असे केल्यास दक्षिण दिशा भारी आणि ऊर्जावान होईल.
 
अर्थव्यवस्था : दक्षिणमुखी व्यवसायात व्यवसायाची उन्नती, फायद्याची स्थिती, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि आर्थीक प्रगती फार वेगाने परंतु थोड्या कालावधीसाठी असते.
 
बांधकाम : दक्षिणमुखी व्यवसायाचे बांधकाम अशा प्रकारे करावे की, व्यवसायातील आतिल आणि बाहेरील शु ऊर्जा आणि आभा मंडळाची सकारात्मक ऊर्जा नेहमी करीता राहील.
 
-  चंद्रशेखर रोकडे