Festival Posters

Vastu Tips For Shoes and Slippers चप्पल किंवा शूज पालथे ठेवल्यास काय घडते

Updated: सोमवार, 13 जून 2022 (17:02 IST)
 
ज्योतिषशास्त्रानुसार चप्पल किंवा शूज घराच्या आत किंवा बाहेर उलटे ठेवल्याने अनेक गंभीर आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात. लोक श्रद्धेनुसार घरात चप्पल आणि बूट उलथून ठेवल्यास घरात रोगाचा प्रवेश होतो. चप्पल आणि शूज उलटे ठेवण्याची कोणती कारणे आहेत आणि त्याचे काय नकारात्मक परिणाम होतात ते जाणून घेऊया.
 
देवी लक्ष्मी रागावते
असे मानले जाते की घरामध्ये एखादी चप्पल किंवा जोडे उलटे पडले तर देवी लक्ष्मी देखील नाराज होते. त्यामुळेच उलटलेली चप्पल ताबडतोब सरळ करावी असे घरातील मोठे सांगत असतात, त्यामागे कोणतेही शास्त्रीय तथ्य नाही.
 
रोग वाढतो
दुसर्‍या लोकमान्यतेनुसार घरात चप्पल आणि शूज उलटे ठेवल्यास रोग, दुःख वाढतात त्यामुळे चप्पल आणि शूज कधीही उलटे ठेवू नका, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.
 
घरातील त्रासही संभवतो
घरात शूज किंवा चप्पल उलटे ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येते. यामुळे घरातील सदस्यांच्या विचारावरही वाईट परिणाम होतो, घरातील सकारात्मकता संपते आणि घरातील वातावरणात अशांतता निर्माण होते. असे मानले जाते की चप्पल उलटी ठेवल्यास घरात कलह निर्माण होतो आणि मारामारी होते. मात्र त्यामागे कोणतेही वैज्ञानिक तथ्य नाही.
 
मानसिक ताण
घराच्या मुख्य दरवाजावर उलटी चप्पल ठेवल्यास घरातील सदस्यांच्या विचारसरणीवर वाईट परिणाम होतो. वास्तूनुसार शूज आणि चप्पल उलटे ठेवल्याने घरातील सकारात्मकता निघून जाते. यामुळे कुटुंबातील सुख-शांती नष्ट होऊन मानसिक तणाव वाढतो.
 
शनीचा क्रोध
धार्मिक श्रद्धेबरोबरच कोणतीही वस्तू योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने ठेवल्यास त्या चांगल्या दिसतात याचेही एक कारण आहे. घरात चपला आणि शूज उलटे ठेवल्याने शनिदेवाचा प्रकोप राहतो, कारण शनिदेव पायांचे कारक मानले जातात.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments