शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (11:44 IST)

मंत्राने करा घरातील वास्तूदोष दूर

आपल्या घरात रोग, दारिद्य्र, अभाव, शुभ कार्यात विघ्न येणे, अपयश यामुळे अशांती आणि वाद होत असतील तर त्यामागे वास्तुदोष हे एक कारण असू शकते. शास्त्रांनुसार वास्तूचा अर्थ आहे ज्या भूमीवर मानवासह अन्य जीव राहात असतील. यात घर, मंदिर, महल, गाव किंवा शहर यांचाही समावेश होतो.
 
या स्थानी सुख समृद्धी, ऐश्वर्य शांती नांदण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार निवास असणे गरजेचे असते. याशिवाय वास्तुदेवतेची पूजा आणि उपासनाही शुभ मानण्यात आली आहे. कोण आहे वास्तू देवता? सुखा समाधानाने राहण्यासाठी त्याची उपासना का करायची?
 
पौराणिक मान्यता आहे की अंधकासूराचा वध करताना भगवान शिवशंकरांच्या मस्तकावर एक घामाचा बिंदू खाली पडला आणि त्यातून भयानक रूप असलेला पुरूष प्रकट झाला. तो या जगाला गिळंकृत करण्यासाठी पुढे सरसावला तेव्हा भगवान शिवासह अन्य सर्व देवतांनी त्याला जमिनीवर झोपविले आणि त्याची वास्तुपुरुष म्हणून स्थापना केली. देव स्वत: त्याच्या देहास निवास करू लागले. यामुळे वास्तूदेवतेची पूजा होऊ लागली.
 
वास्तुदेवतेत सर्व देवतांचे स्थान असल्यामुळे नियमित देवपूजेत विशेष मंत्राने वास्तुदेवाचे ध्यान केल्यास वास्तू दोष दूर होतात. हा साधा सोपा उपाय आहे. घराची तोडफोड न करताही यामुळे वास्तूदोष दूर करणे शक्य आहे.
 
दररोज इष्ट देवाची पूजा करताना हातात पांढरे चंदन लावलेले पांढरे फूल व अक्षत घेऊन वास्तूदेवाचे खालील वेदमंत्राने स्मरण करा. या मंत्राचा जप करताना सारे कलह, संकट आणि दोष होण्याची कामना करा. इष्टदेवाला फूल, अक्षत चढवून आरती करा.
 
वास्तोष्पते प्रति जानीह्यस्मान् त्स्वावेशो अनमीवो: भवान्। 
यत् त्वेमहे प्रति तन्नो जुषस्व शं नो भव द्विपदे शं चतुष्पदे।।
 
ऋग्वेदातील या मंत्राचा अर्थ आहे... हे वास्तुदेवता, आम्ही तुझी हृदयापासून उपासना करतो. आमची प्रार्थना ऐकून आपचे रोग पीडा आणि दारिद्य्र दूर करा. धन वैभवाचीही इच्छा पूर्ण कर. वास्तू क्षेत्र अथवा या घरात राहणा-या सर्व नातेवाईक, पशू आणि वाहन आदींचे शुभ आणि मंगल करा.