रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By

वास्तू घरात लावा मनी प्लांट, पण काटेरी रोप ठेवू नये

वास्तू शास्त्रानुसार ज्या प्रकारे घरातील प्रत्येक भाग आमच्या जीवनाला प्रभावित करतो, तसेच घरात सजावटीसाठी ठेवण्यात आलेले रोप देखील आमच्या जीवनावर चांगले व वाईट प्रभाव टाकतात. बर्‍याच वेळा आम्ही असे रोप घरात लावतो ज्यामुळे वास्तुदोष उत्पन्न होतात. 
 
आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की घरात कुठल्या प्रकाराचे रोप ठेवायला पाहिजे आणि कुठले नाही. याची माहिती या प्रकारे आहे -  
 
1. वास्तू शास्त्रानुसार घरात मनी प्लांट लावणे फारच शुभकारक असतो. ज्योतिष प्रमाणे मनी प्लांट शुक्र ग्रहाचा कारक आहे. मनी प्लांट घरात लावल्याने नवरा बायकोतील संबंध प्रेमळ होतात.  
 
2. घरात कांटेदार व दूध (ज्यांना कापल्याने पांढरे द्रव्य निघत) निघणारे रोप लावू नये. कारण काटी नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करतात. गुलाबा सारखे कांटेदार रोप लावू शकता पण त्याला घराच्या छतावर लावले तर उत्तम.   
 
3. तुळशीचा पौधा फारच कल्याणकारी, बहुपयोगी, पवित्र आणि शुभ मानला जातो. तुळशीत एंटीबायोटिक समेत अनेक औषधीय गुण असतात. याचा स्पर्श व याचे वायू दोन्ही फायदेशीर आहे. म्हणून याला घरात अवश्य लावावे.
4. बेडरूममध्ये कुठल्याही प्रकारचे रोप लावू नये. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. डायनिंग व ड्रॉइंग रूममध्ये तुम्ही कुंडे लावू शकता.   
 
5. जर घराच्या एखाद्या भिंतीवर पिंपळाचे झाड आले तर त्याची पूजा करून त्याला कुंड्यात लावायला पाहिजे. पिंपळाला बृहस्पती ग्रहाचा कारक मानला जातो.  
 
6. बॉन्सायी पौधेपण घरी तयार करू नये आणि बाहेरून देखील आणून घरात लावण्याचे टाळायला पाहिजे. वास्तू शास्त्रानुसार, घरात बॉन्सायी झाडं लावल्याने धनाशी निगडित अडचणींना तोंड द्यावे लागते. 
7. गुलाब, चंपा व चमेलीचे पौधे घरात लावणे चांगले मानले जाते कारण याने मानसिक तणाव व डिप्रेशन दूर होतो.   
8. बेडरूमच्या नैरृत्य कोणात टेराकोटा किंवा चिनी मातीच्या फूलदानात सूरजमुखीचे असली किंवा नकली फूल लावू शकता.  
 
9. पौधे व फुलांचा उपयोग घरातील टोकेरी कण आणि उबड़-खाबड़ जमिनीला धकण्यासाठी केला जातो.  
 
10. घरात सुंदर पानांचे रोप जसे - सायकस, एक्लिया, अर्लिया, फिलोडेण्ट्रोन व ऐरिका इत्यादी लावू शकता.