बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By

तुमचं घरं वास्तुशास्त्रानुसार आहे ना?

घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती.. या उक्तीप्रमाणे घर कितीही मोठं अलिशान असलं तरी तरी त्यात घरपणं असेलच असं नसतं. त्यात नात्यांचा ओलावा असावा लागतो. अनेकवेळा या नात्यांमध्ये ओलावा असूनही घराला घरपण मात्र नाही, अशी तक्रार होताना दिसते. यावेळी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे आपलं घर वास्तुशास्त्रानुसार योग्य आहे का?

वास्तुशास्त्राच्या नियमानुसार अगदी १00 टक्के तंतोतंत घर असणं हे आपल्याकडून कधीच शक्य होत नाही. त्यामुळे आपल्या घरात काही विचित्र गोष्टी घडत असतात; परंतु आपल्याला ते कळून येत नाही की असं का होतंय. वास्तुमध्ये काहीना काही दोष हे राहणारच. ते दोष कमीत कमी राहतील म्हणून वास्तुशास्त्रानुसार रचना करावी. हे अगदी कोणालाही सहज करण्यासारखे उपाय आहेत ज्यामुळे घरात सुख शांती येते. घरामध्ये खालील सहा फोटो नकोत महाभारताच्या युद्धाचे चित्र, ताजमहल, नटराजची मूर्ती, बुडणारे जहाज, फव्वारा, जंगलातील जनावरांचे फोटो इत्यादी चित्र घरात ठेवू नये. असे मानले जाते की, जसे घरात चित्र असतात तसेच वातावरण घरात तयार होत असते.; पण आपल्याला कधी कळून येत नाही.

वास्तुशास्त्राची रचना करताना अनेक प्राचीन ऋषींनी खूप खोलवर विचार केलेले ग्रंथ लिहिले आहे. म्हणून वास्तुशास्त्रानुसार जर घर बनविले तर घरही सुंदर होते व घरात शांतताही प्रस्थापित होते. बेडरुम, किचन, हॉल, देवघर हे सगळे वास्तुशास्त्रानुसार हवे. गृहिणी स्वयंपाक करताना पूर्व, उत्तर दिशेला हवं. देवघर हे ईशान्याच्या कोपºयात असायला हवे. किंवा पूर्व-पश्चिमेला असायला हवे. बेडरुमही नैऋत्यास असायला हवे. प्रवेशद्वार हे उत्तर-पूर्व दिशेला असणे अत्यंत शुभ मानले जाते.